*रविवार दि. 03 मार्च 2019 रोजी अकिवाट ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथे द्वितीय विभागीय युवा बौद्ध धम्म परिषद संपन्न
झाली. ही परिषद दरवर्षी फेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्याचा ठराव 20 जानेवारी 2019 रोजी झालेल्या राज्यस्तरीय तृतीय युवा बौद्ध धम्म परिषदेत करण्यात येऊन त्याची अंमलबजावणीही झाली.*
*अकिवाट येथील परिषदेच्या पूर्वसंध्येला लहान मुले आणि महिलांनी महापुरुष जयघोष फेरी काढून प्रचार केला. परिषदे रोजी सकाळी 9.00 वाजता गावांतून ग्रंथ आणि संविधान सन्मान फेरी काढून सुरुवात झाली.*
*परिषदेचे उदघाटक मा. सुनिल गोटखिंडे (जिल्हा नियंत्रक, वंचित बहुजन आघाडी) यांनी उदघाटनपर मनोगतात तथागत बुद्ध आणि संत बसवेश्वर यांच्या समतेच्या विचारांवरच भारतीय संविधानाची निर्मिती झालेली आहे याचे विवेचन केले.*
*परिषदेचे स्वागताध्यक्ष डॉ. मिलिंद हिरवे (अध्यक्ष, डॉ. मिलिंद हिरवे फाऊंडेशन, पेठवडगांव) यांनी पुलवामा मधील शहिदांना आदरांजली वाहून स्वागतपर व्याख्यान दिले, यात त्यांनी युवा बौद्ध धम्म परिषदेच्या कृतीकार्यक्रमांचा आढावा घेतला. प्रतिमा पूजन, उदघाटन आणि स्वागतानंतर सामूहिक संविधान उद्देशीका आणि त्रिसरण-पंचशील ग्रहण करण्यात आले.*
*प्रमुख मार्गदर्शक मा. अनिता गवळी (अध्यक्ष, राष्ट्रक्रांती घरेलू कामगार संघटना, कोल्हापूर) यांनी 'सम्यक वाणी आणि आपली चळवळ' या विषयावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'सम्यक वाणी' या तथागतांनी सांगितलेल्या अष्टांगिक मार्गापैकी एका मार्गाला आयुष्यभर आपल्या आंदोलनात साधन बनविले याची मांडणी केली. युवा वक्ते मा. प्रथमेश देसाई यांनी 'कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्ध प्रेरणास्थळे' यावर बोलताना बुद्ध पठार, पोहाळे लेणी यांचे महत्व पटवून दिले.*
*समारोपात बोलताना प्रा. किरण भोसले (संकल्पक, युवा बौद्ध धम्म परिषद, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य) यांनी तथागत बुद्ध आणि आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली साधनेच येथे समता स्थापित करू शकतात, ती साधने वापरणे हे परिवर्तनवादी चळवळींचे कर्तव्य आहे, बाबासाहेबांनी धर्मांतरानंतर दिलेला सर्वांत मोठा कृती कार्यक्रम म्हणजे 'दर रविवारी विहारात जाणे' हा होय. या कृतीकार्यक्रमावर अंतर्मुख होऊन विचार करून युवा बौद्ध धम्म परिषद ने धम्म प्रचार प्रसाराची मशाल हाती घेतली आहे असे सांगितले.*
*यावेळी नियमितपणे दर रविवारी विहारात येणाऱ्या 25 मुला-मुलींना शालेय साहित्य वितरित करण्यात आले. समारोप सामूहिक धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आला.*
*परिषदेत मा. राहुल वराळे, दै. महानायक, प. महाराष्ट्र आवृत्ती प्रमुख, डॉ. विकास पाटील, प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, मा. दयानंद जीरगे, जिल्हा प्रतिनिधी, लॉर्ड बुद्धा टीवी चेनेल, मा. कमलाकर सारंग, संपा. साप्ताहिक बहुजन रयत, प्रसिद्ध शाहीर अशोक काळे, ऍड. राहुल कट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.*
*ही परिषद यशस्वी करण्यासाठी मा. विश्वास कांबळे वार्ताहर, दै. महासत्ता, अश्विनी कांबळे, चारूदत्त माळगे, अक्षय माळगे, सुधाकर कांबळे, वैभव कांबळे, डॉ. संजय कांबळे, कृष्णा कांबळे, सुरज कांबळे, सचिन दरबारे, मीरा कांबळे, सुप्रिया कांबळे, शरावती माने, कविता कांबळे, रेश्मा कांबळे, अश्वजीत कांबळे, सौरभ कांबळे, सोमनाथ कांबळे, प्रवीण कांबळे, योगेश कांबळे, वंदना कांबळे, अनुराधा कांबळे (माजी सरपंच), हेमंत कांबळे (ग्राम पंचायत सदस्य), रामचंद्र (पिंटू) हेरवाडे, अमोल कांबळे, रोहित माळगे, ऍड. नेमिनाथ कांबळे, विजय बीरणगे, गुंडा बीरणगे, विशाल माने, किशोर गस्ते, अशोक बीरणगे, विद्या कांबळे, आक्काताई बीरणगे तसेच सर्व संघटक, युवा बौद्ध धम्म परिषद, बाल कल्याण मैत्री संघ, सम्राट वॉरीअर आणि सम्राट चेरिटेबल ट्रस्ट यांनी मेहनत घेतली.*

टिप्पण्या