मुख्य सामग्रीवर वगळा

शिंदे कुटुंबातील मुलगी व नात ठार तर जावई अत्यावस्थ :गेवराई जवळील माळवा पाटीजवळ अपघात (नांदेड प्रतिनिधी रियाज आत्तार)

नांदेड रियाज आत्तार) महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. विश्वांभर शिंदे हारबळकर यांची जेष्ठ कन्या सौ. मनिषा ज्ञानेश्वर जाधव (३५) रा.पुर्णा, कु. लावन्या ज्ञानेश्वर जाधव, बोलेरो गाडीने त्यांच्या टाटा कंपणीच्या कार वर (MH 14- P 8639) आदळल्याने कार खड्यात जाऊन पेट घेतली त्यात सौ.मनिषाचा जागेवरच कोळसा झाला तर कु. लावण्या उपचारादरम्यान मरण पावली तर जावई ज्ञानेश्वर शंकरराव जाधव हे अत्यावस्थ असून औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत.
      महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. विश्वांभर शिंदे हारबळकर यांनी आपली जेष्ठ कन्या मनिषाचा विवाह पुर्णा येथील ज्ञानेश्वर जाधव यांच्याशी केला होता. ज्ञानेश्वर यांचे वडील परभणी येथे न्यायालयात तर आई आरोग्य खात्यात नौकरीला असल्याने ते परभणी स्थाईक झाले होते. ज्ञानेश्वरचा लहान भाऊ प्रसाद जाधव यांचा विवाह असल्यामुळे पुणे येथे कंपणीत नौकरी ला असलेला ज्ञानेश्वर परभणी येथे आपल्या कुटुंबासह आला होता. १६ मे च्या लग्नानंतर १८ चे रिसेप्शन आटोपून दि. २१ मे रोजी ज्ञानेश्वरचे कुटुंब पुण्याकडे निघाले होते. गेवराई जवळील माळवा पाटीजवळ बोलेरो गाडीने टक्कर दिल्याने गाडी खड्यात पडली. परीसरातील व्यक्तींनी अपघात झालेल्या गाडीतून कु.लावण्या व ज्ञानेश्वरला बाहेर काढताना गाडीने पेट घेतला व गाडीत असलेल्या सौ. मनिषा जळून खाक झाल्या. कु. लावण्या रुग्णालयात मरण पावली तर ज्ञानेश्वर उपचार घेत असलेतरी अत्यावस्त आहेत असे नातेवाईकाकडून समजले. मुखेड येथील दिपनगर येथील रहिवाशी व महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा. विश्वांभर शिंदे हारबळकर यांना झालेल्या आघातामुळे मुखेडात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या