मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

ऑगस्ट, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

होलार समाजाचा एल्गार मेळावा संपन्न झाला

पालम - महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे तांबुळगाव ता.पालम जि.परभणी येथे दि.25 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.  रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दत्ता हेगडे सर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो. होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवून घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.समाजाला एका छत्राखाली एकत्र करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी वैचारिक मंथन घडवुन युवका...

'नांदेडच्या गोल्डमॅन' गोविंद कोकुलवार वर भरदिवसा गोळीबार..नांदेड प्रतिनिधी आत्तार रियाज

 नांदेड : कोंग्रेसचे माजी नगरसेवक तसंच 'नांदेडचे गोल्डमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले व्यापारी गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील चौफाळा या भागात त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला. सायंकाळी ६.०० वाजल्याच्या सुमारास गोविंद कोकुलवार हे आपल्या कार्यालयाजवळ दाखल झाले. यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या आणि पाठिमागून दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरानं त्यांच्या पाठीवर गोळी झाडली. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला.पाठीत गोळी लागल्यानं कोकुलवार गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रक्रृती गंभीर असल्याने कोकुलवार यांना मुंबईला हलवण्याची तयारी सुरु आहे.दरम्यान या घटनेनंतर चौफाळा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी कोकुलवार यांना खंडणीसाठी धमकी आल्याचीदेखील माहिती आहे.उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी शहरात दोन व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये एखादी खंडणी वसुली करणारी गॅंग कार्यरत झाली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत.

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार

डोंबिवली : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत एका मुलीवर मागील चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या या 19 वर्षीय विद्यार्थिनीला या 41 वर्षीय पदाधिकाऱ्याने त्याच्याशी मैत्री करण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला होता. याचा राग आल्याने या नराधमाने पीडितेला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जुलै 2015 ते ऑगस्ट 2019 या काळात वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. संदीप माळी असे या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीने शनिवारी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत संदिपला अटक केली.

रस्त्यासाठी नांदेडमधील अख्खे गावच बसले उपोषणाला

कुरुळा (जि़ नांदेड) : कंधार तालुक्यातील मौजे महालिंगी येथील गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रस्त्यासाठी आबालवृद्धांसह तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे़ तालुक्यापासून ३५ किमीवर असलेल्या या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही़ त्यामुळे १७६० लोकसंख्येच्या या गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे़ शिक्षण, बाजार व रोजगारासाठी १० कि.मी.वर असलेल्या हाडोळती येथे जावे लागते. त्यात महालिंगी ते शेलदरा हा रस्ता खचून गेला आहे़ नाल्याच्या पाण्यात मागील एक मुलगा आणि काही जनावरे वाहून गेल्याची घटना ताजी आहे़ १९७२ ला कच्चा रस्ता झाल्याचे माजी सरपंच विश्वंभर नारायण कुटे हे सांगतात़ येणारी बसही रस्ता नसल्यामुळे बंद झाली आहे़ तर रुग्णांनाही खाटेवरुन न्यावे लागते. यामुळे सर्व गावच उपोषणाला बसले आहे़ ही आरपारची लढाई लढायची असल्याचा इशारा वृद्ध तुकाराम गोपाळ गुंठे यांनी दिला़ तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे रुक्मिणीबाई गिते, मंगलबाई भागवत गुटे, गोदावरीबाई कुठे, अनुसया पांचाळ या महिलांनी सांगितले. भाऊ गुटे, बाबूराव केंद्रे, अशोक गुट्टे, नागोराव गुट्टे यांनी जिल्...

रत्नाकर गुट्टेंच्या संपत्तीवर बँकांचा ताबा घेणार.!१७३७ कोटींची थकबाकी

गंगाखेड शुगर कर्ज प्रकरणात अटकेत असलेले रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेक या कंपनीकडे १७३७ कोटी ६३ लाख ३० हजार २०२ रुपयांचे कर्ज थकीत असल्याची नोटीस युको बँकेने प्रसिद्धीस दिली आहे. विशेष म्हणजे हे कर्ज वसूल करण्यासाठी गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबीयांची परळी आणि गंगाखेडमधील संपत्ती ताब्यात घेण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गंगाखेड शुगरबरोबर रत्नाकर गुट्टे यांच्या नावे असणाऱ्या सुनील हायटेक या कंपनीला युनायटेड बँक ऑफ इंडिया, लक्ष्मीविकास बँक आणि ओरिएंटल बँक, आयसीआयसीआय, आयडीबीआय, सिंडिकेट, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, करुर वैश्य बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनी एकत्रितपणे कर्ज दिले होते. २०१८ पर्यंत कर्जाची ही रक्कम १४२० कोटी ७७ लाख ३५ हजार ७७ एवढी होती. त्याचे ३१ डिसेंबपर्यंतचे व्याज ३३६ कोटी ८५ लाख ९५ हजार १२५ एवढे होते. ही सगळी रक्कम वसूल करण्यासाठी युको बँकेने घर, भूखंड, शेतजमीन ताब्यात घेण्याची नोटीस जाहीर केली आहे.  रत्नाकर गुट्टे, तसेच सुनील हायटेकचे संचालक सुधामती गुट्टे, विजय रत्नाकर गुट्टे व सुनील रत्नाकर गुट्टे यांच्या नावे परळी येथील घर व...