पालम - महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे तांबुळगाव ता.पालम जि.परभणी येथे दि.25 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते. रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.दत्ता हेगडे सर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो.
होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवून घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.समाजाला एका छत्राखाली एकत्र करून स्वाभिमानी समाज निर्माण करण्यासाठी वैचारिक मंथन घडवुन युवकांना दिशा देण्याचे काम या मेळाव्यात करण्यात आले. यासाठी स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्यावतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते,
या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी फुले शाहू प्रा.एम.एम. सुरनर सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जि.प.सदस्य गणेशराव रोकडे व अध्यक्षस्थानी संघटने संस्थापक शिवाजीराव जावीर व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.दत्ता हेगडे,आश्विन गोरवे,गतखाणे,प्रा.एम.एम.सुरनर,गोपीनाथ तुडमे, मा.जयदेव खांडेकर,चंद्रकांत टाळकुटे,लहू गेजगे, डॉ. रामराव उंदरे,एकनाथ जाहिर, मल्लिकार्जुन सुरनर,प्रल्हाद भोईनर,भगवान उंदरे,बाजीराव जोरवर,एकनाथ गेजगे,मा.संतोष आवळे,पद्माकर साळे, नामदेव ब्रिंगणे, आदी उपस्थित राहणार आहेत. याच मेळाव्यात स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या शाखेची स्थापना करण्यात आली. शाखाध्यक्ष माणिकराव आवळे, उपाध्यक्ष. बालासाहेब आवळे, सचिव संतोष आवऴे, कोषाध्यक्ष काशिनाथ आवळे, पुडंलिक आवऴे आदि या कार्यक्रमाला होलार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी परिश्रम राघुजी आवळे,एकनाथ आवळे,वामन आवळे,संभाजी आवळे, वैजनाथ आवळे डिगंबर आवळे, राम आवळे,त्र्यंबक आवळे,बबन आवळे, गणपती आवळे, अर्जुन आवऴे,पिराजी आवळे,अंताराम आवऴे,गोंविद आवऴे माधव आवळे,बालाजी आवळे पाडुरंग आवळे,विशेष शिवाजीराव आवऴे,गंगाराम आवऴे,संतोष आवळे आदिनी परिश्रम केले....
टिप्पण्या
Ashich pahije samaj sena welcome