*होलार समाजातील मुलांना जिल्हाधिकारी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ...असे प्रतिपादन प्रा.एम.एम. सुरनर ================== गंगाखेड- महाराष्ट्रात मोठ्या संख्येने असलेल्या होलार समाजामध्ये स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी परभणी जिल्हा स्तरिय समाज मेळाव्याचे आयोजन मौजे वंदन ता.सोनपेठ जि.परभणी येथे दि.08 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. रवीवार रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाची सुरूवात झाली कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.एम.एम. सुरनरनर त्याबरोबरच संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव जावीर तर होलार समाजाचे युवा वक्ते प्रबोधनकार प्रा.एम.एम.सुरनर यांची प्रमुख दिशा दर्शक मार्गदर्शन करण्यात आले. समाजाला मार्गदर्शन करत असताना समाजाने शिक्षण घेतले पाहिजे,त्याबरोबरच संघटीत राहिले पाहिजे ज्यामुळे समाजाला डाँ बाबासाहेबांनी निर्माण केलेले मुल्य समता,स्वातंत्र्य,न्याय,बंधुता याची जोपासना करता येईल असे प्रतिपादन करत पुढे ते म्हणाले व शिकल्याने व्यक्तिचा सामाजिक,राजकीय,व आर्थिक विकास होतो. होलार समाजात गेल्या अनेक वर्षांपासून नेत्रत्वाचा अभाव होता.त्यामुळे समाजातील प्रश्न प्रशासकीय पातळीवर सोडवू...