मुख्य सामग्रीवर वगळा

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई करा:-माजी आमदार सुभाष साबणे (नांदेड रिपोर्टर रियाज आतार )

नांदेड (प्रतिनिधी) बिलोली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये शेतकर्‍यांच्या हाताला आलेले सोयाबीन,कापूस,तुर या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान  झाले आहे त्याचप्रमाणे नदी काठावरील खरडपट्टी व माती वाहुन गेलेल्या शेतीचे खूप साऱ्या चांगले आहे या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी आमदार सुभाष साबणे यांच्या वतीने नायब तहसीलदार नरवाडे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी त्यांच्या समवेत
शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील विधानसभा मतदारसंघ संघटक अवधूत भारती शिवसेना देगलूर दक्षिण शहर प्रमुख सुनील नागशेट्टिवार माजी शहरप्रमुख व्यंकट पुरमवार शिवसेना उपशहरप्रमुख संजय जोशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यादव फिरंगे श्रीनिवास मंदीलवार बाबुराव मिनकीकर मारोतराव नाईक मनसक्करगेकर आदींची उपस्थिती होती

टिप्पण्या