मुख्य सामग्रीवर वगळा

मतमोजणीवर उमेदवारांनी घेतला आक्षेप प्रचंड गोंधळ (प्रतिनिधी:-सचीन मेश्राम)

मतमोजणीवर उमेदवारांनी घेतला आक्षेप प्रचंड गोंधळ
प्रतिनि
धी. सचीन मेश्राम. वणी.यवतमाळ
वणी. वणी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना 12व्या फेरीअंती काही उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका घेत प्रत्येक मतदान यंत्राची फेर मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केल्याने चागलाच गोंधळ उडाला..
भाजपचे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवर यांना पहिल्या फेरी पासून आखेरपर्यत आघाडी मिळाली उर्वरीत उमेदवारांना मात्र अनपेक्षित अशी मते पडली त्यामुळे 12व्या फेरीअंत मनसेचे राजु उंबरकर अपक्ष संजय देरकर, विश्वास नांदेकर, काँग्रेस चे वामनराव कासावार, संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे आदिनी आक्षेप घेतला. मतमोजणी संशयास्पद असल्यामुळे प्रत्येक मतदान यंत्राची फेरमोजणी घेण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .शरद जावळे यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली. या उमेदवारा मध्ये यावेळी प्रचंड रोष  होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली.परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी नंतर आक्षेप अर्जाचा विचार करता येईल,असे या उमेदवारांना सांगितले. मात्र या उमेदवाराचे त्यावर समाधान झाले नाही आत्ताच फेरमतमोजणी करा, असा आग्रह या उमेदवारांनी केला.परंतु जोपर्यंत मतमोजणी घेता येत नाही असा युक्तिवाद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केला मात्र तरीही सर्व उमेदवार आपल्या मागणीवर बराच वेळ ठाम होते

टिप्पण्या