केळापुर तालुक्यातील उमरी येथे कर्तव्य पार पाडुन मारेगांवकडे दुचाकीने येणाऱ्या जमादारास भरधाव इंधन टँकरने जबर धडक देत चिरडले. यात जमादाराचा करून अंत झाल्याची दुर्दैवी घटना मारेगांव राज्य महामार्गावरील इसार पेट्रोल पंप वळणावर शनिवारी सकाळी साडेदहा वाजताचे दरम्यान घडली.ऐन सनासुदीच्या काळात काळाने घाला घातल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
मधुकर निळकंठराव मुके (५२) असे अपघातात मुत्युमुखी पडलेल्या जमादाराचे नाव असुन ते वणी तालुक्यातील मेंढोली येथील मुळ रहिवासी होते सन २०१५ मध्ये मारेगांव पोलीस स्टेशनला रुजु झाल्यानंतर गत चार महिन्यापुर्वी यवतमाळ पोलीस मुख्यालयातून त्याना केळापुर तालुक्यातील उमरी पोलीस चौकीवर डेप्युटेशनवर .देण्यात आले रात्री पाळी चे कर्तव्य पार पाडल्यानंतर मारेगांव येथे कुटुंब वास्तव्यात असल्याने दुचाकीने ते मारेगांवकडे निघाले. करणवाडी समोर आल्यागत मागावून भरधाव वेगाने इंधन टँकरने समोरील मुके यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक बेतालवस्थेत चालविणाऱ्या टँकर चालकाच्या लक्षात आली नसल्याने भरधाव टँकर परत डाव्या बाजूला असलेल्या इसार पेट्रोल पंपाकडे वळला. यात दुचाकी बाजुला फेकल्या गेली व मुके जमादार टँकरच्या समोरील दोन्ही चाकाच्या मधात सापडले. अशातच या थरारक प्रसंगात मुके हे सुखरूप होते. त्यावेळस ते उभे होण्याच्या प्रयत्नात खाली पडले मात्र भरधाव वेगाने वळण घेतलेल्या बेजबाबदार टँकरचालकाच्या आपल्या गाडी खाली कोणी तरी असल्याची कल्पनाच आली नसल्याने टँकरचे मार्गील चाक शरीरावरून जाऊन मुके जागीच गतप्राण झाले. हा थरकाप सोडणारा प्रसंग पेट्रोल पंपाच्या सिसीटिव्ही कँमेऱ्यात कैद झाला. दरम्यान ऐन दिवाळी च्या सनाच्या सुरूवातीला मुके कुटुंबात सर्वत्र आंनदचे वातावरण असताना कुटुंब प्रमुख नावाचा कायमचा दिवा विझला. या दुर्दैवी घटनेने विरजण पडले. मारेगांव येथील स्मशानभूमीत मधुकर मुके यांच्यावर सायंकाळी यवतमाळ व मारेगांव येथील पोलीस पथकाने ट उपनिरीक्षक अमोल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितित हवेत गोळ्या फैरी झाडून मानववंदना दिल्यानंतर शासकीय इतमामात अत्यसंस्कार करण्यात आले मारेगांव जमादाराच्या एक्झिट ने पंचक्रोशीसह पोलीस वर्तुळात शोंककाळा पसरली असुन मृत मुके याच्या पश्चात आई ,पत्नी, तिन मुली,एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.

टिप्पण्या