मुख्य सामग्रीवर वगळा

मेघना बोर्डीकर वर्षा वर...डॉ. पाटील मातोश्रीवर!! वरपुडकर थेट बांधाबांधावर

मेघना बोर्डीकर वर्षा वर...डॉ. पाटील मातोश्रीवर!! वरपुडकर थेट बांधाबांधावर!!!




परभणी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदारांनी भेटीगाठी वर भर दिला....... परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी थेट मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटी घेतल्या त्याच वेळेला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची त्यांनी भेट घेतली...
आज मुंबईत वर्षा निवासस्थानी _देवेंद्र_फडणवीसभेट घेतली. जिंतूर-सेलू ची आमदार या नात्याने मेघना बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मतदार संघाच्या वतीनं दिवाळी निमित्त शुभेच्छा देतानाच जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण_विषयांवर त्यांचेशी चर्चा झाली..पावसामुळं जिल्हयात झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहीतीही  दिली. संपुर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पाठीशी सरकार खंबीरपणानं ऊभं राहणार असल्याची ग्वाही यावेळी  त्यांनी दिली ...
पाथरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी मात्र थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी सुरू केल्या ........परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी वरपुडकर शेतावर गेले..... पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतीतील पिकांची त्यांनी पाहणी केली.......
दुसरीकडे गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील निवडून आलेले आमदार रत्नाकर गुट्टे मात्र तुरुंगात आहेत

टिप्पण्या