मुख्य सामग्रीवर वगळा

खा. प्रतापराव पाटील मोठ्या अपघातातून बचावले (नांदेड रिपोर्टर रियाज आतार)

खा. प्रतापराव पाटील  मोठ्या अपघातातून ब
चावले !.
हजारो लोकांअंतकरणातून 'आशीर्वाद 'या बळावर नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर एका मोठ्या प्रसंगातून आज बचावले.जॅके राखे साईंया मार सकेना कोई। आज अनुभवायला मिळाले. दिवाळीत हजारो लोकांच्या आशीर्वादाने प्रतापरावांचे प्राण वाचले बालाजी जाधव यांची प्रसंगसावधानता लक्षात घेऊन गाडीवर कंट्रोल करत हजारों लोकांच्या मनात घर करून असलेले खासदार प्रताप्राव चिखलीकर यांचे त्यांच्या ड्रायव्हरने प्राण वाचवले असेच म्हणावे लागेल
      लोह्यातील व्यापाऱ्यांना दिवाळी’च्या शुभेच्छा देण्यासाठी खा. प्रतापराव पाटील मार्केट कमेटीला दिवाळी पाडव्याला येत असतात त्याच प्रमाणे आज दुपारी (२८ ऑक्टोबर २०१९ सोमवार रोजी येथील साईबाबाचे दर्शन घेऊन दोन’च्या सुमारास लोह्याकडे निघाले.डेरला फाट्याच्या जवळ आल्यानंतर ‘ नांदेड’कडे   एम एच २६- ७७४९ शंभरच्या स्पीड ने ट्रक येत होता. तो ट्रक  एक थेट खासदारांच्या गाडीवर आदळणार तेवढ्यात प्रसंगावधान राखून ड्रायव्हरने  आपले गाडी कंट्रोल करतात बाजूला घेतली आणि होणारा भीषण अपघात टाळला गाडीत बसलेल्या खासदारांना काही सुचेनासे झाले कारण त्यांना जीवनदान मिळाले होते यावेळी खासदार प्रतापराव हादरले.सोबत युवासेना जिल्हा प्रमुख  माधव पावडे होते त्यांनाही काहीच सुचेना प्रसंगच एवढा भयानक होता की त्यातून सावरण्यासाठी प्रतापरावांना अर्धा तास लागले  माधव व बालाजीने खासदाराना सावरले. जिल्हाप्रमुख माधव पावडे, सारथी बालाजी  भेदरून गेले 'साहेबांच्या 'तोंडातून... एकही शब्द बाहेर पडला नाही ...काय झाले हे कळेना मात्र जनतेच्या आशीर्वादामुळेच प्रतापराव चिखलीकर बचावले असल्याच्या जनसामान्यात ऊन प्रतिक्रिया येत होत्या 

टिप्पण्या