मुख्य सामग्रीवर वगळा

पोलीस कोठडीत तरुणाचा मृत्यू प्रकरणी: पाच पोलीस निलंबित

मुंबई : वडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या कस्टडीत एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी पाच पोलिसांना निलंबित केले आहे. विजय सिंह असं मृत तरुणाचे नाव आहे. अद्याप मृत्यू कशाने झाला हे अजून स्पष्ट झाले नाही.मृत विजय सिंह एका फार्मा कंपनीत काम करत होता. सोमावारी रात्री एका प्रेमी युगुलासोबत वाद झाल्याने जोडप्याने विजयला वडाळा पोलीस स्टेशनमध्ये नेले. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर विजयच्या छातीत दुखू लागले. परंतु, पोलिसांनी केवळ नाटक करत असल्याचे बोलून दुर्लक्ष केले आणि मारहाण केली, असं सांगितलं जात आहे.यानंतर विजयची आई पोलीस स्टेशनमध्ये पोहचली. पण त्यांनाही भेटू दिले नाही. रात्री 2 वाजता विजय जमिनीवर कोसळला असता त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यानंतर कुटुंबियांकडून तसेच विभागातली इतर लोकांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांविरोधात मोर्चे काढण्यात आले. यामध्ये स्थानिक आमदार, खासदार यांनीही सहभाग घेऊन पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला आहे.
वडाळा कस्टडीतील मृत्यू प्रकरणात विजयची तक्रार करणाऱ्या प्रेमी युगुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दशरथ देवेंद्र आणि आफरीन, असं या प्रेमी युगुलाचे नाव आहे. तसेच हा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणीही करण्यात येत आहे

टिप्पण्या