मुख्य सामग्रीवर वगळा
रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा :-जितेंद्र आव्हाड यांचा टोला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा भाजपा-शिवसेनेच्या महायुतीला पसंती दिली. गेल्या हंगामाच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये घट झाली असली तरीही सत्ता स्थापनेची पहिली संधी ही महायुतीकडेच आहे. मात्र गेले काही दिवस शिवसेना-भाजपात सत्तास्थापनेवरुन सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. शिवसेना सत्तास्थापनेत ५०-५० च्या सुत्राप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे. मात्र भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला कोणत्याही प्रकारे असा शब्द देण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं. या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी टोला लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.शिवसेना-भाजपात सध्या सत्तास्थापनेवर नाट्य सुरु आहे. “दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. या नाटकातून दोन्ही पक्षांचं चारित्र्य जनतेला कळत आहे. भाजपा-शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे सत्ता स्थापन करणं त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा तर मंगळवारी भाजपाचा मुख्यमंत्री करा आणि राहिलेला रविवार आठवले साहेबांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा”, अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपा-सेनेला टोला लगावला आहे. याचसोबत भाजपा-शिवसेनेचे नेते जनतेला मूर्ख बनवत असल्याचंही आव्हाड म्हणाले
टिप्पण्या