मुख्य सामग्रीवर वगळा
आईची हत्या करुन मृतदेह घरात असतानाच तिने मित्राबरोबर ठेवले शरीरसंबंध

एकाहून अधिक मुलांबरोबर प्रेमसंबंध ठेवण्यास विरोध करणाऱ्या आईची एका १९ वर्षीय विद्यार्थिनीनेच प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये उघडकीस आली आहे. हयातनगर येथील द्वारका कॉलनीमध्ये राहणाऱ्या ३८ वर्षीय रंजीता यांची त्यांच्याच मुलीने हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर या मुलीने काही दिवस आईचा मृतदेह एका खोलीत लपून ठेवला. याच कालावधीमध्ये दोन दिवस त्या खोलीमध्येच तिने आणि प्रियकराने शरीरसंबंध ठेवल्याची माहिती समोर येत आहे.पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किर्ती रेड्डी या तरुणीने आपला प्रियकर बाल रेड्डी आणि मित्र शशीच्या मदतीने आईची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. आईची हत्या केल्यानंतर या मुलीने आई बेपत्ता होण्यासाठी आपले वडील जबाबदार असल्याचा बनाव केला. आपले वडील आईचा छळ करायचे त्यांनीच तिचे बरेवाईट केल्याचा आरोप या मुलीने केला होता. मात्र पोलिस चौकशीमध्ये तिने आपला गुन्हा मान्य केल्यानंतर घटनाक्रम ऐकून पोलिसांनाच धक्का बसला.हत्या झालेल्या रंजीता यांचे पती श्रीनिवास हे लॉरी चालक आहेत. २४ ऑक्टोबर रोजी ते आपल्या घरी आले तेव्हा त्यांना दरवाजाला टाळं दिसलं. त्यांनी रंजीता यांना फोन केला असता तो नॉट रिचेबल येत होता. अखेर त्यांनी आपली मुलगी किर्ती हिला फोन केला. त्यावेळी किर्तीने आपण विशाखापट्टणमला अभ्यास दौऱ्यासाठी आल्याची माहिती दिली. त्यावेळी श्रीनिवास यांनी तिला रंजीता बेपत्ता असून तातडीने हैदराबादला परत येण्यास सांगितले. मात्र गुरुवारी झालेल्या या संवादानंतर किर्ती शनिवारी हैदराबादला परतली आणि तिने पोलिसांकडे आई बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.किर्तीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये वडिलांना दारुचे व्यसन असून ते दारु पिऊन आईला त्रास द्यायचे असा आरोप केला. दारुच्या नशेत ते आईला बेदम मारहाण करायचे असंही किर्तीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले. घरी आल्यानंतर श्रीनिवास यांनी किर्तीकडे विशाखापट्टणमला जाण्याच्या कारणाबद्दल विचारले असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रंजीताच्या बेपत्ता होण्यामागे किर्तीचा हात असल्याचा संशय श्रीनिवास यांना आला. रंजीता बेपत्ता असल्याचे समजल्यानंतर किर्तीचा प्रियकर बाल रेड्डीचे वडील श्रीनिवास यांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी दोघांमध्ये झालेल्या चर्चेमधून किर्तीचा खोटारडेपणा उघड झाला. “मागील काही दिवसांपासून रंजीताच्या सांगण्यावरुन किर्ती आमच्या घरी राहत होती,” अशी माहिती बाल रेड्डीच्या वडिलांनी श्रीनिवास यांना दिली. त्यानंतर श्रीनिवास यांनी पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी किर्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबुल करत शशीच्या मदतीने आपण आईची हत्या केल्याचे मान्य केले.किर्तीने दिलेल्या माहितीनुसार प्रियकर असण्याच्या मुद्द्यावरुन रंजीता आणि किर्तीचे १९ ऑक्टोबर रोजी कडाक्याचे भांडण झाले. यावेळेस किर्तीने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या शशीला या भांडणामध्ये आपली बाजू मांडायला सांगत आईशी वाद घातला. त्याच रात्री किर्ती आणि शशीने रंजीता झोपेत असतानाच साडीने गळा आवळून त्यांची हत्या केली. २२ तारखेपर्यंत हे दोघे याच खोलीत रंजीता यांच्या मृतदेहाबरोबर राहिले. त्यांनी या दिवसांमध्ये शरीरसंबंधही ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.दोन दिवसांनंतर रंजीता यांच्या मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागला. त्यावेळी किर्ती आणि शशीने त्याच्या गाडीमधून हा मृतदेह तुम्मालगुडा येथील रेल्वे स्थानकाजवळ नेऊन रेल्वेच्या रुळांवर टाकून दिला. रंजीता यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी मृतदेह रेल्वे रुळावर टाकल्याची कबुली दिली आहे.आईचा मृतदेह रेल्वे रुळांवर टाकून दिल्यानंतर किर्तीने तिच्या मोबाईलवरुन बाल रेड्डीच्या वडिलांना फोन करुन रंजीता यांच्या आवाजात किर्तीला काही दिवस तुमच्या घरी राहू द्या असं सांगितले. आपण एका नातेवाईकाला भेटण्यासाठी काही दिवस बाहेर जात असल्याने किर्तीला तुमच्याकडे राहू द्यावे असं या कॉलवर किर्तीने रंजीता बनून रेड्डी यांना सांगितले. त्यानंतर किर्तीच्या वडिलांनी फोन केला तेव्हा तिने बाल रेड्डीच्या घरी असूनही आपण विशाखापट्टणमला असल्याची माहिती वडिलांना दिली. पोलिसांनी किर्तीच्या मोबाईलवरुन लोकेशन संदर्भातील माहिती काढली असता ती हयातनगरमध्ये असल्याचे स्पष्ट झाले.हयातनगर पोलिसांनी रेल्वे पोलिसांकडे चौकशी केली असता २२ तारखेला एक अनोळखी महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत अढळल्याची माहिती दिली. अपघाती मृत्यू म्हणून नोंद केल्यानंतर हा मृतदेह जवळच्या स्मशानभूमीमध्ये दफन केल्याचेही रेल्वे पोलिसांनी सांगितले
टिप्पण्या