मुख्य सामग्रीवर वगळा

बहिणीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या भावाची निर्घृण हत्या

दिल्ली
प्रदेशमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण करणारी घटना कैराना येथे घडली आहे. बहिणीची छेड काढणाऱ्यांना विरोध करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हा सर्व धक्कादायक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मृत तरुणावर चाकूने हल्ला केल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. मृत तरुणाचे नाव विकी असून संबंधित घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली आणि या हल्ल्यात जखमी झालेला विकी २७ ऑक्टोबर रोजी सफदरजंग रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मरण पावला.मिळालेल्या माहितीनुसार काही तरुण एका मुलीची सतत छेड काढायचे. सततच्या या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणीने छेड काढणाऱ्यांची तक्रार आपल्या २२ वर्षीय भावाकडे केली. बहिणीची छेड काढणाऱ्यांना रंगेहाथ पकडून जाब विचारण्याचा निर्णय घेतला. विजय सिंग पाठक सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ विकीने अंजू नावाच्या तरुणाला बहिणीची छेड काढताना पकडले. त्यानंतर या दोघांमध्ये वाद झाला. यावादाचे रुपांतर हणामारीमध्ये झाले. त्यावेळेस अंजूच्या काही मित्रांनी एकत्र येऊन विकीला बेदममारहाण केली. या मारहाणीमध्ये एकाने विकीच्या पोटात चाकू खुपसला. चाकू खुपसल्यानंतरही विकी अंजू आणि त्याच्या मित्रांशी लढत होता. मात्र विकीच्या पोटातून येणारे रक्त पाहून अंजू आणि त्याचे मित्र घटनास्थळावरुन पसार झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.रक्ताच्या थारोळ्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या विकीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तीन दिवसांनी उपचारादरम्यान विकीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अंजू आणि त्याच्या मित्रांना अटक केली आहे. विकीच्या मृत्यूनंतर या सर्वांवर खूनाचा खटला चालवला जाणार आहे.

टिप्पण्या