हिंगोली : ‘साहेब परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे’. कापून ठेवलेल्या सोयाबीन पिकांना कोंब फुटली या परिस्थितीत शेतकरी जगणार कसा त्यांना मदत मिळाली पाहिजे यासाठी विमा कंपन्यांकडे पाठपुरावा करा अशा सूचना आमदार संतोष बांगर यांनी दिल्या.परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतामध्ये गुडघ्या एवढया पाण्यामध्ये सोयाबीनच्या सुडया आहेत. तर कापून ठेवलेली सोयाबीन अस्ताव्यस्त पसरले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब फुटले असून या पिकांचे 50 टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.रविवारी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील देवजना, शेवाळा व इतर भागात भेट देऊन पाहणी केली.शेतात सोयाबीनची परिस्थिती पाहून आमदार बांगर यांचे डोळे पाणावले. जिल्ह्यातील प्रमुख पीक समजल्या जाणाऱ्या सोयाबीनची नुकसान झाल्याने नवीन भागाचे अर्थकारण कोलमडले. साहेब, या परिस्थितीमध्ये माझा शेतकरी जगणार कसा ? शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत आर्थिक मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू मात्र पिक विमा कंपन्यांकडे ही प्रशासनाने पाठपुरावा करून तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना द्याव्यात असेही आमदार बांगर यांनी तहसीलदार वाघमारे यांना सांगितले.नुकसानी नंतर 72 तासांमध्ये तक्रारी देणे आवश्यक आहे. मात्र या परिसरामध्ये बीएसएनएल ची रेंज नाही इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे तक्रार करणे कठीण झाले. त्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार करून पिक विमा कंपन्यांना नुकसानीचे पंचनामे करण्यास भाग पाडावे अशा सूचनाही आमदार बांगर यांनी दिल्या आहेत.
टिप्पण्या