पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसुल, कृषी, विमा कंपनी कडे संयुक्त पंचनाम्याचा आग्रह धरावा:- भाई विष्णुपंत घोलप
*पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी महसुल, कृषी, विमा कंपनी कडे संयुक्त पंचनाम्याचा आग्रह धरावा.* :- भाई विष्णुपंत घोलप
पाटोदा ( प्रतिनिधी ) गेल्या आठवडाभरातील अचानक आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन सह इतर सर्व पिकांचे अंतोनात नुकसान झालेले असुन त्या साठी शेतकऱ्यांनी शासनाकडे लेखी निवेदन किंवा अर्ज देऊन आपणाला विमा किंवा अनुदान मिळण्यासाठी महसुल, कृषी आणि विमा कंपनी कडे संयुक्त पंचनामा करण्यासाठी आग्रह धरावा असे आवाहन भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे शेतकऱ्यांना केले आहे.
पावसाळयाचे संपुर्ण दिवस टंचाई व थोडया फार पावसावर गेलेले असताना सोयाबीन, बाजरी, मका, तीळ व इतर पिकांची काढणी चालु असताना कापुस, कांदा, तुर व भाजीपाला या पिकांना आठवडाभरातील सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले असुन त्या शेतकऱ्यांना शासनाकडुन अनुदान किंवा शेतकऱ्यांनी पिकाच्या झालेले नुकसानीचे १०० टक्के विमा मिळावा म्हणून पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाकडे महसुल, कृषी,आणि विमा कंपनी असा संयुक्त पंचनामा करण्यासाठी लेखी निवेदन किंवा अर्जाव्दारे आग्रह धरावा. जेणे करुन शेतकऱ्यांना आपल्या न्याय हक्कासाठी येणाऱ्या काळात न्यायालय किंवा ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल असे आवाहन भाई विष्णुपंत घोलप यांनी पावसाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पण्या