मुख्य सामग्रीवर वगळा

शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई : मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना शिवाजी पार्क पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे (Sandeep Deshpande Arrest). सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांच्यावर आहे. दादर-माहिम परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिवाळी निमित्त लावलेल्या कंदिलांवर महापालिकेने कारवाई केली होती (BMC action on MNS sky lamp). महापालिकेने हे कंदिल काढून कचऱ्यात टाकले, त्यावरुन मनसे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांना फैलावर घेतलं होतं(Sandeep Deshpande vs BMC officer). यावेळी त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

टिप्पण्या