रस्त्याच्या कढेला उभ्या ट्रकला बोलेरो जीप धडकली; ८ जण जागीच ठार, २ जण गंभीर जखमी:.
-घटनास्थळी रक्ताचा सडाच मृतांमध्ये दोन पोलीस,व वजन मापी अधिकाऱ्याचा समावेश
पाटोदा (प्रतिनिधी )दि.११ मांजरसुंबा ते पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ उभ्या ट्रकला बोलेरो जीप धडकून झालेल्या भीषण अपघातात बोलेरो गाडीतील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान बालकासह दोन पोलीस व एक वजन मापी अधिकाऱ्याचा आणि दोन महिलांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास हा अपघात झाला दारू सोडविण्याचे औषध घेण्यासाठी बोलेरो गाडी क्र .MH-23 AS ,3470 मधून केज तालुक्यातील निवडुंगवाडी येथील हे लोक बीड तालुक्यातील बेलखंडी येथे जात होते. मांजरसुंबा - पाटोदा रोडवर वैद्यकिन्ही जवळ आले असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रोडवर उभ्या ट्रकला मागच्या बाजूने धडकली. हा अपघात एवढा भीषण होता कि बोलेरो गाडीतील आठ जण जागीच ठार झाले. यात वैजिनाथ ज्ञानोबा तांदळे, केसरबाई बन्सी मुंडे, बाळू पंढरीनाथ मुंडे, अशोक मुंडे,आसराबाई भीमराव मुंडे व अन्य दोन हे जागीच ठार झाले आहेत. चालक मात्र या अपघातातून बचावला असून तो गंभीर जखमी आहे. या अपघाताची माहिती समजताच गावातील नागरिकांसह सर्वानीच घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले या भीषण अपघात स्थळी गाडीमध्ये अडकलेली मृत प्रवाशांची शरीर व रक्ताचा झालेला सडा मन हेलावून सोडणारा होता.
या हृदयद्रावक अपघाताने अपघात ग्रस्त कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनास्थळी नातेवरकांचा आक्रोश आणि अक्रोशाचा आवाज उपस्थितांचे मन चिरून जात होता .या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर जिल्हा अधीक्षक विजय भाबडे, यांनी भेट देऊन संबंधितांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

टिप्पण्या