मुख्य सामग्रीवर वगळा

राज्यपालांचं फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण

Governor invite Devendra Fadnavis, राज्यपालांचं फडणवीसांना बहुमत सिद्ध करण्यासाठी निमंत्रण
मुंबई: महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून तयार झालेला पेच काहीसा सुटत असल्याचं दिसत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर आपल्या बाजूने सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी भाजपचे विधीमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.आता भाजप बहुमत सिद्ध करणार का हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासह सत्तावाटपाच्या 50-50 फॉर्म्युल्यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे भाजप बहुमताची तजवीज कशी करणार हा प्रश्न आहे.नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामध्ये भाजपाला 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेसला 54 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. तसेच मनसेला एक जागा आणि अपक्षांना 28 जागा मिळाल्या आहेत.

टिप्पण्या