मुख्य सामग्रीवर वगळा

बदली मान्यता आदेशाच्य प्रतीमुळे गोंधळ"तीन महिन्या पासुन शिक्षकांचा पगार बंद




गंगाखेड़:- तालुक्यातील मौजे मरडसगांव येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था अंतर्गत बळीराज विद्यालयातील सर्व कार्मचारी यांना कार्यल्याच्या चुकीमुळे विनाकारण मागील तीन महिन्यापासुन वेतन मिळत नसल्याने ओढ़ावलेल्या आर्थिक अडचनीचा सामना करवा लागत आहे. याबाबत सविस्तर वृत असे की,कलाध्यपक श्री मुंढे एस.एल. हे श्री रेणुकादेवी विद्यालय राणिसावर ता.गंगाखेड़ जि.परभणी येथून संस्था अंतर्गत बदली होऊन मरड़सगांव येथील बळीराजा विद्यालयात रुजू झाले.त्यावेळी सौ.कांबळे या मुख्याध्यापक म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी मुंढे यांचा बदली मान्यतेचा प्रस्ताव शिक्षण अधिकारी कार्यालयात दाखल केला व श्री मुंढे यांचा पगारही सुरु झाला.
काही कालावधीतच सौ.कांबळे यांची संस्थे अंतर्गत राणिसावरगांव येथील शाखेवर बदली झाली व त्यांच्या जागेवर प्रभारी मुख्याध्यापक म्हणून श्री कोरडे ए.एम. यांची नियुक्ति झाली.ऑनलाइन प्रक्रिये साठी बदली मान्यतेची प्रत शोधली आसता, श्री मुंढे यांची बदली मान्यता प्रत आढळून आली नाही.आणि तेंव्हा पासुन हे प्रकरण उघड़े पडले. आणि गुंता अधिकच वाढला,संबधित कर्मच्याऱ्याची बदली मान्यता प्रत नसताना देखील संबंधित लिपिक व मुख्याध्यापक यांनी बिले काढली कशी?  दोन वर्ष ही बाब कोणाच्याही कशी लक्ष्यात आली नाही? शालेय दस्तावेज जतन करणे हे कोणाचे काम असते? ही कार्यलयतील संबधित अधिकारी आणि कर्मचारी यांची जबाबदारी आसताना त्यांच्या चूकीची शिक्षा इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना का भोगवी लागत आहे? या बाबत दिलेल्या कर्मचारी यांनी दिलेल्या निवेदनातून असे दिसून येते आहे की,सध्याचे प्रभारी मुख्याध्यापकांचे म्हणने आहे की,"श्री मुंढे एस. एल. यांच्या बदली मान्यता आदेशाची प्रत कार्यालयात उपलब्ध नही,ती शिक्षणाधिकारी कार्यालयातून मुख्याध्यापिका सौ कांबळे व लिपिक भाऊसाहेब जाधव यांची जबाबदारी होती."तर मुख्याध्यापिका कांबळे यांचे लेखी म्हणणे आहे की,बदली मान्यते शिवाय संबंधित लिपिक भाऊसाहेब जाधव यांनी मुंढे यांची देयके कशी सादर केली?".आणि लिपिक भाऊसाहेब जाधव यांचे म्हणणे आहे की,"बदली मान्यता प्रत मी संबंधित कार्यालयातून आणलीच नाही व शालेय कार्यालयातही ती आढळून आली नाही.वरिष्ठ अधिकारी यांच्या संधिग्ध स्टेटमेंट मुळे सर्व पीड़ित कर्मचाऱ्या गोंधळ उड़ाला आहे.या प्रकरणा संदर्भात तत्काळ कार्यवाही करून बंद आसलेला पगार सुरु करण्याच्या हेतुने,संबधित मुख्याध्यापक,संबंधित संस्थेचे पधाधिकारी यांनाही वेळो वेळी लेखी व तोंडी कळविले आहे परंतु आद्यपही कोणतीच ठोस कार्यवाही झालेली नाही, त्या मुळे वरिष्ठ आधिकारी म्हणून शिक्षणाधिकारी यांच्याकडे संदर्भात सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य ती कार्यवाही करुन बंद आसलेल वेतन सुरु करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे दिला आहे या निवेदनावर मांजरमे ,मुुंडे, जाधव, पवार,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या