मुख्य सामग्रीवर वगळा

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, अजित पवार उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची पसंती उद्धव ठाकरे यांच्या नावाला होती. काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला.राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची बैठक मुंबईतील नेहरू सेंटर इथे झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणाले, "अजून चर्चा सुरू आहे. आम्ही असं ठरवलं आहे की कोणतीही गोष्ट अनुत्तरित ठेवायची नाही. अनेक मुद्यांवर एकमत झालं आहे. थोडे बारकावे शिल्लक आहेत. मला अर्धवट माहिती द्यायची नाही. एकत्र पत्रकार परिषद घेऊन घोषणा करू."
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात सकाळी हा सोहळा झाला.

टिप्पण्या