मुख्य सामग्रीवर वगळा

ऊसतोड मजुराच्या मुलाने केलेले संक्षिप्त प्रश्न व त्यांची मोजकी उत्तरं."

*आले वाटतंय बीड बार्शीचे नगरे..!*
  "ऊसतोड मजुराच्या मुलाने केलेले संक्षिप्त प्रश्न व त्यांची मोजकी उत्तरं."


       उच्चशिक्षित व उच्चभ्रू लोकांच्या *नगरी*   हा शब्द लवकर लक्षात येणार नाही,पण मराठवाडा, खानदेश, विदर्भातील बिनकामाच्या रिकामटेकड्या पोरांना जरी विचारलं ना ते लगेच मोठं वर्णन करून सांगतं ते खालीलप्रमाणे....

*त्यांना गावाकडं पक्की घर असतात का..?*


             नगरी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी पट्टयातील लोकांनी बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, हिंगोली, गडचिरोली, आदिवासी भागातील जे लोक सध्या १०पत्र्याच्या घरापासून ते ४-५लाखांच्या स्लॅपच्या घरामध्ये राहणारी ही लोक असतात.

*त्यांना स्वतःची शेती असते का..?*

       घरी पोटापुरती म्हणजे २ एकर रापासून ती १२-१३  एकरांवर शेती असते, रब्बीच्या पिकाचे म्हणजे सोयाबीन, उडीद, मुग, बाजरी या पिकांचे ५ हजारांपासून ते १लाख५० हजारांवर यांचं उत्पन्न या लोकांना वर्षकाठी निघते..!

*त्यांचे मुलं शिक्षण घेतात का..?*

     या लोकांची मुलं शिक्षण घेतात, परिस्थितीमुळे काही प्रमाणात त्यांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही,भेटत नाही,पण काही प्रमाणात याच मजुरांची मुले बीड जिल्ह्यात उच्चशिक्षित डॉक्टर, इंजिनिर, वकील, शिक्षक, उद्योजक, व्यावसायिक आहेत हे सत्य आहे.

*ते सहा महिने गावाकडं काय करतात..?*

  या मजुरांना घरी जी शेती असते त्या शेतीसाठी व उत्पादन वाढीसाठी विहीर, शेततलाव,बंधारे,शेतीची कामे करतात, काही लोक दुसऱ्याच्य बांधावर जाऊन मोलमजुरी करतात, काही लोक गावाकडे हॉटेल,रसवंती, ट्रॅक्टर चालवण्याची कामे करतात. व कुटूंब त्यामधून मिळणाऱ्या पैशावर चालवतात.

*त्यांची येवढी चांगली परिस्थिती असताना मग ते ऊसतोडणीसाठी गाव सोडून बाहेर का स्थलांतर करतात..?*
        हा मुख्य प्रश्न आणि या परिस्थितीवरचे सविस्तर उत्तर.."मित्रांनो महाराष्ट्र राज्यात १००% पाण्यापैकी ६०% क्षेत्र हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राने व्यापले आहे,व बाकी राहिलेले ४०% क्षेत्र हे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागात विभागलेले आहे. त्यामुळे या भागात पाहिजे तेवढं पाणी या भागात नाही,पावसाचे प्रमाणही या भागात नेहमी कमीच राहते,त्याचबरोबर या भागात जलसाठे, मोठे कालवे,धरणांचे व पाणीसाठ्याचे कुंभ कमी आहेत त्यामुळे साहजिकच या भागात दिवाळीनंतर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करून २-३ किलोमीटर अंतरावरून डोक्यावर, बैलगाडी, सायकल व मिळेल त्या साधनांच्या मदतीने ते घरापर्यंत व गुरापर्यंत आणावे लागते ही आहे पाण्यासाठीची वणवण..!

        दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षण,मुळात या भागात लोक पाण्यासाठी मिळेल तिथे योग्य पडेल तेथे पाण्याला जवळ करून शेतामध्ये लोकवस्ती करून राहतात, त्यामुळे सहाजिक त्यांच्या मुलांचा तालुक्यातील व गावातील शाळेत जाण्याचा संपर्क व एकोपा तुटतो त्यामुळे खेडोपाडी शिक्षणाचा टक्का घटतो तिथे उच्च शिक्षणाची भेटच होत नाही,त्यामुळे अशिक्षितपणाच्या पदरी पुन्हा कोयता पडतो.

           रोजगार उपलब्ध नाहीत,मुळामध्ये जशी माणसाला पाण्याची मूलभूत गरज भासते, तसे उद्योगधंदे म्हटलं की मुख्य म्हणजे रस्ते,पाणी,वीज या तीन गोष्टींच्या अभावामुळे या भागात कुठेही मोठे उद्योगधंदे, कंपन्या, मिल उभा राहायला तयार नाहीत, त्यामुळे दिवाळी व दुष्काळ आला की लगेच पुण्य मुंबईकडे रोजगार व पोटापाण्यासाठी लोंढेची लोंढे जातात.

"संक्षिप्त प्रश्न व उत्तर बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांचा मुलगा इंजि. हुले दत्ता बळीराम याच्या अनुभवातून व अभ्यासातून संकलित केले आहे."

टिप्पण्या