राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांना भारतरत्न देण्याची होतेय मागणी, मोदींना एक लाख भाविक निवेदन पाठवणार
चाकूर : म.फुले,सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी होत असताना आता लातूर जिल्ह्यातून राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य
महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात मागणी होत आहे. या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवली जात असून, एक लाख भाविकांच्या स्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठविले जाणार आहे.देशासाठी सेवाकार्य करणाऱ्या व्यक्तीला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात येते. राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे देशसेवेसाठी कार्य आहे. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, समाजसेवा, राज्य उभारणीसाठी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून केलेले अतुलनीय कार्य आहे. वयाच्या 102 व्या वर्षीही हे कार्य अविरतपणे चालू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ही पदवी त्यांनी वर्ष 1945 मध्ये लाहोर विद्यापीठातून पूर्ण केली. देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त करण्यासाठी सुरू झालेल्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.संत साहित्यांचे महान चिंतक म्हणून त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मागील 65 वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली कपिलधार पदयात्रा काढली जाते. यात विविध जाती, धर्मांचे लाखो भाविक सहभागी होतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाने त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली जात आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर तसेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न देण्याबाबत शिफारस केलेली आहे.यासाठी नांदेड येथील लेखक प्रा. आनंद कर्णे हे स्वाक्षरी मोहीम राबवीत असून, कपिलधार पदयात्रेच्या निमित्ताने दिंडीसोबत प्रत्येक गावात जाऊन भाविकांच्या सह्या घेत आहेत. एक लाख सह्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर केले जाणार असल्याचे प्रा. कर्णे यांनी सांगितले.या निवेदनावर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, विठ्ठल माकणे, विलासराव पाटील, बालाजी पाटील, नितीन रेड्डी, सिद्धेश्वर पवार, ऍड. संतोष माने, ऍड. विक्रम पाटील, ऍड. युवराज पाटील, मोहनराव पाटील, सुधाकर पताळे यांनी सह्या केल्या.

टिप्पण्या