*विद्युत महावितरणचा गलथान कारभार पारगाव (घुमरा)येथे गाईच्या मृत्यू
*
:~ शेतकऱ्यांला महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी.:- गणेश कवडे
पाटोदा (शेख महेशर):~ पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे अनेक दिवसा पासून विद्युत तारा जमिनी जवळ लोंबकळत असुन पारगाव ग्रामस्थांनी वारंवार महावितरणला माहिती देऊन देखील महावितरण कंपनीने विद्युत तारा दुरुस्त न केल्या मुळे शनिवार दिनांक- ०९/११/२०१९ रोजी घुमरा पारगाव येथील विद्युत प्रवाहाच्या तारा जमिनी जवळ लोंबकळत असल्याने आबासाहेब पांडुरंग सोनसळे यांच्या मालकीची गायचा विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेला स्पर्श झाला़ व त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही माहिती महावितरण कंपनीला कळविले असता अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव दिली असलेली तरी पंचनामा झाला का नाही हे शेतकऱ्यांना माहिती नसल्याने आधीच परतीच्या पाऊसाने हातचे पीक गेल्याने शेतकरी आबासाहेब सोनसळे हे हवालदिल झालेले आहेत. व त्यातच महावितरणच्या गलथान कारभारामुळे गाईचा विद्युत तारेला स्पर्श होऊन जवळपास पन्नास हजार रूपये किंमतीच्या गाईचा मृत्यू झाल्याने सोनसळे हतबल झाले असुन आपण या पुढे काय करावे हा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला असून, पारगाव (घुमरा) येथील शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगून देखील विद्युत तारा काढल्या नसल्यामुळे गाईचा मृत्यू झाला असल्याने शेतकऱ्यांला महावितरण कंपनीनी कडुन शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पाटोदा तालुकाध्यक्ष श्री.गणेश कवडे यांनी केली आहे.

टिप्पण्या