मुख्य सामग्रीवर वगळा

“शेवंता जिती हाय !” या एका रहस्य प्रधान नाट्य प्रयोगाचे सादारीकरण (सिद्धार्थ मस्के)


दिनांक १६ नोव्हेंबर २०१९.....
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित, महाराष्ट्र राज्य हौशी मरठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला नांदेड केंद्रावर जेष्ठ रंगकर्मी लेखक, दिग्दर्शक डॉ. विलास भद्रे यांच्या हास्ते उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळ सदस्य राम चव्हाण, अ. भा. म. नाट्य परिषद शाखा नांदेडचे कार्यवाह गोविंद जोशी, तसेच परीक्षक प्रभाकर दुपारे- नागपूर, प्रमोद काकडे- पुणे, प्रकाश खोत- सोलापूर, यांच्या प्रमुख उपस्थिती नटराज पूजन आणि दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन झाले. समन्वयक दिनेश कवडे, सह. समन्वयक किरण टाकळे कवडे, अमोल जैन यांनी मान्यवरांचे नाटकांवर आधारित पुस्तके देऊन मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी उद्घाटकिय भाषणात डॉ. विलास भद्रे यांनी स्पर्धेच्या बदलत्या रूपा बद्दल सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कोतूक केले. तसेच नांदेड केंद्रावरील मागच्या काही वर्षापासून वाढता प्रेक्षक वर्ग, संघांचे समाधान, सुयोग्य नियोजन याबद्दल समन्वयक दिनेश कवडे यांचे अभिनंदन केले. सूत्र संचालन आनंद शिंदे यांनी केले.

      स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रसिकांना एक उत्तम नाटक पाहता आले. यश चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने प्रल्हाद जाधव लिखित सुनील ढवळे दिग्दर्शित “शेवंता जिती हाय !” या एका रहस्य प्रधान नाट्य प्रयोगाचे सादारीकरन
झाले.
      शेवंता या पात्राच्या तपासाभोवती संपूर्ण नाटक गुंफवण्यात आले. शेवंता हारवल्याची तक्रार माणूस ( रवी पुराणिक ) हा पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो. हा अजागळ, व विचित्र माणूस रेल्वेच्या डब्ब्यातील संडासमध्ये लिहलेल्या एका वाक्यावरून म्हणजेच “शेवंता जिती हाय!” या एका वाक्यावरून तिच्या तपासाला सुरवात करण्यासाठी इन्स्पेक्टर ( सिद्धार्थ मस्के ) यांच्या कडे तक्रार घेऊन जातो. सुरवातीला इन्स्पेक्टरला हि सगळी गोष्ट काल्पनिक, कल्पोकल्पी वाटते नंत गूढ जसे जसे उलगडत जाते तसे तसे इन्स्पेक्टरचा संशय माणसावर होतो व त्याची कस्टडी काढतो, टॉर्चर करतो पण जेव्हा हवालदार पिसाळ ( सौरभ कुरुंदकर ) याला डी. आय. जी चा फोन येतो तेंव्हा खरोखरच हि गोष्ट काल्पनिक नसून प्रत्यक्ष घडली असे कळते. मग सुरवात होते खर्या खुन्याला पकडण्याची. यातील संशयित नागलवाडीचा सरपंच बाळासाहेब पाटील खंडेराजुरिकर ( सुनील ढवळे ) याला घेऊन माणूस पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येतो व शेवंताच्या खुनाची कबुली त्या पाटलाकडून अतिशय चालाख पद्धतीने घेतो. पण शेवटी सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही. पोलीस स्टेशन मध्ये होम मिनिस्टरचा फोन आल्याने इन्स्पेक्टर हतबल होतो.
या नाटकाची प्रकाश योजना- सरला दिवाण यांनी केली, तर संगीत- सिद्धांत उमरीकर, रंगमंच व्यवस्था- आदर्श कवळीकर व शुभम एडके यांनी सांभाळली, नेपथ्य- तक्षक मस्के तर रंगभूषा- रवी कात्नेश्वरकर, वेशभूषा- उदय कात्नेश्वरकर यांनी सांभाळली.स्पर्धेच्या पहिल्याच दिवसी रसिक प्रेक्षकांनीही गर्दी केली होती. स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी गौतम गायकवाड, अभिषेक दाढेल, मोहन कवटगी, कुलदीप इंगळे हे काम पाहत आहेत.आज रविवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ज्ञान संस्कृती सेवाभावी संस्था, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, भीमाशंकर कुलकर्णी दिग्दर्शित,  “सिस्टीम क्रॅश” या नाट्य प्रयोगाचे सदरीकरन होणार आहे. तरी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी नाट्य प्रयोगाचा रसस्वाद घ्यावा आशी विनंती नांदेड केंद्रावरील समन्वयक दिनेश कवडे यांनी केली आहे.

टिप्पण्या