*पाटोद्याचे तहसीलदार मा . रमेश मुंडलोड साहेब यांचे हार्दिक स्वागत.* :- कॉ . महादेव नागरगोजे
पाटोदा ( *शेख महेशर* ):- पाटोदा तालुक्यात गेल्या चार वर्षापासुन अत्यअल्प पावसामुळे तालुक्यातील जनतेला पाण्या अभावी अत्यंत वाईट दिवस काढावे लागले. आता परतीच्या पावसाने पाटोदा तालुक्यातील सिंचन तलावात चांगल्यापैकी पाणी साठा झालेला आहे. तालुक्यात दुष्काळात पाणी टंचाई जाणवते म्हणून तहसीलदार मुंडलोड साहेब यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व तालुक्यातील पाणी आरक्षित करण्याचे आदेश दिले. त्या मुळे भारतीय कम्युनिष्ट पक्ष व किसान सभेचे नेते यांनी मा. तहसीलदार साहेब यांना हार्दीक शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. दि.२ नोव्हेंबर २०१९ रोजी आष्टी, पाटोदा, शिरुर विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.श्री.बाळासाहेब आजबे काका हे निवडुन आल्यानंतर पाटोदा तहसील मध्ये तहसील सहीत सर्व अधिकारी विविध पक्षाचे नेते कार्यकर्ते व जनप्रतिनिधीची बैठक घेऊन तालुक्यातील अतिवृष्टीने झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान भरपाई, लाईट, आरोग्य सेवा व खरीप २०१९ चा पिक विमा पाणी इत्यादी प्रश्नावर सांगोपांग चर्चा होऊन कॉ. महादेव नागरगोजे यांनी या वर्षी परतीचा पाऊस अंत्यत चांगला झाल्यामुळे सिंचन तलाव, मध्यम प्रकल्प, छोटे प्रकल्प यात पाणी साठा भरपुर झाल्यामुळे हे पाणी आरक्षित करावे अशा प्रकारचे निवेदन कॉ.नागरगोजे यांनी केले होते. तहसीलदार मुंडलोड साहेब यांनी सर्व पाणी आरक्षित केल्या बद्दल काँ.महादेव नागरगोजे यांनी तहसीलदार साहेब यांच्या सह सर्व अधिकाऱ्यांना हार्दीक शुभेच्छा देऊन त्याचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या