अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आता याबाबत एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मौन सोडलं आहे. त्यांनी आज एक ट्विट करत मला माझी मशीद परत हवी असं वादग्रस्त वक्तव्य काल केलं आहे.मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाप्रमाणेच मीसुद्धा या निकालाशी सहमत नाही. सुप्रीम कोर्ट ‘सुप्रीम’ असले तरी कोर्टाकडूनही चूक होऊ शकते, असे विधान ओवेसी यांनी केले होते. ज्यांनी बाबरी मशीद पाडली त्यांनाच ट्रस्ट बनवायला सांगून राम मंदिर उभारायला सांगण्यात आले आहे, असे नमूद करत जर आज मशीद उभी असती तर सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिला असता?, असा प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केला होता.सर्वोच्च न्यायालयाकडून ९ नोव्हेंबर रोजी रामजन्मभूमी वादग्रस्त जमीनप्रकरणी निर्णय देण्यात आल्यानंतरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली होती. न्यायालयाच्या निर्णयावर समाधानी नसल्याचंही ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहेच परंतु तेदेखील चूकू शकतात. आमचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढा देत होतो, आम्हाला देणगी म्हणून देण्यात येणाऱ्या जागेची गरज नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
टिप्पण्या