मुख्य सामग्रीवर वगळा

प्रणिती शिंदे यांनी मागणी करताच जिल्हाधिकारी यांनी घेतली तातडीची बैठक.

डेंग्यूच्या साथीवर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना व्हावी याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांच्या मागणीनुसार मा. जिल्हाधिकारी यांनी अधिकारयासमवेत घेतली तातडीची बैठक.


सोलापूर : सोलापूर शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून डासांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आहे. शहरात डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याची तसेच डेंग्यूमुळे केतकी उडाणशिव (रा. दक्षिण सदर बझार), गौतमी देवसानी (रा. पद्म नगर) आणि यश वंगारी (रा. दाजी पेठ) यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या पाश्र्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी आज सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2019 रोजी मा. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाज्यांसमवेत तातडीने बौठकीचे आयोजन करण्याची मागणी केली होती. याअनुषंघाने मा. जिल्हाधिकारी यांनी तातडीने बौठक आयोजित केली. सदर बौठकीमध्ये सोलापूर महापालिकेकडून डेंग्यू प्रतिबंधात्मक विशेष मोहिम राबवित सर्व प्रभागांमध्ये विशेष पथके तयार करावीत आणि या पथकांमार्फत खालील उपाययोजना करणे महत्वाचे असल्याची मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली :
1) तापाच्या रुग्णांचे सव्र्हे करणे.
2) डेंग्यूसदृश रुग्णाची तातडीने रक्त तपासणी अहवाल मिळण्याची सुविधा करणे.
3) डास अळी सर्वेक्षण करणे.
4) औषधे फवारणी करणे.
5) धूर फवारणी करणे.
6) साचलेल्या पाण्यात अळीनाशक टेमिफॉस सोडणे.
7) गप्पी मासे सोडणे.
8) व्हेंट पाईपला जाळी बांधणे.
9) नागरिकांमंध्ये जनजागृती करणे.
10)  डेंग्यू रुग्णास मोफत ब्लड प्लेटलेटस् उपलब्ध करुन देणे.
11)  डेंग्यू रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्यास त्या रुग्णास खाजगी रुग्णालयाचेच बिल नुकसान 
 भरपाई म्हणून अदा करण्यात यावे.
12)  डेंग्यूने मृत पावलेल्या रुग्णांच्या कुटुंबियास तात्काळ नुकसान भरपाई मिळणे.
त्यानुसार या बौठकीमध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी सिव्हील सर्जन श्री. ढेले, सोमपा आरोग्य अधिकारी श्री. संतोष नवले, जिल्हा परिषद आरोग्य अधिकार श्री. जमादार व शासकीय रुग्णालयाचे वौद्यकीय अधिक्षक श्री. धडके साो. यांना योग्य तो समन्वय साधून सोलापूर शहरात डेंग्यूला प्रतिबंध करण्याकरीता व सद्यपरिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याकरीता विविध उपाययोजना तात्काळ करण्यात याव्यात असे आदेश दिले. तसेच येत्या आठवडयाभरात डेंग्यूचे निदान होण्याकरीता घेणारया रक्त तपासणीचे ल्यब मेडीकल कॉलेजमध्ये सुरु करण्याचे आदेश देण्यात आले.

टिप्पण्या