मुख्य सामग्रीवर वगळा

दिग्दर्शक शंकर भेंडेकर यांनी "पखवाज" वाजवत राम कृष्ण हरीच्या गजरात चित्रपटाचा शुभारंभ


राणीसावरगाव प्रतिनिधी गंगाखेड तालुक्यातील आरबुजवाडी येथे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी पखवाज या चित्रपटाचा शुभारंभ चा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी पखवाज या चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर भेंडेकर निर्माता लिंबाजी मुंडे सिनेअभिनेते संदीप पाठक ऋतुजा धर्माधिकारी मयुरी आव्हाड दिग्दर्शक गोपी मुंडे आदींची उपस्थिती होती  पखवाज या चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी दिग्दर्शक शंकर भेंडेकर यांनी पखवाज वाजवत राम कृष्ण हरी च्या गजरात चित्रपटाचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात आरबुजवाडी येथे घेण्यात आला शुभारंभाच्या प्रथम पखवाज या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणाऱ्या संदीप पाठक यांना वृक्ष देऊन त्याचा सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित गावकऱ्यांना संबोधित करताना संदीप पाठक म्हणाले की या चित्रपटात वारकऱ्यांची परंपरा रीत रिवाज आणि पखवाज अवघ्या महाराष्ट्राने पहावा असा चित्रपट तयार करायचा आहे यासाठी आपले सहकार्य अपेक्षित असल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले तसेच गावात शुभारंभाचा कार्यक्रम घेतला तुम्ही ज्या पद्धतीने आमचा सन्मान केला आणि त्याच पद्धतीने आम्हाला चित्रपट शूट करत असताना सहकार्य कराल अशी आशाही व्यक्त केली विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक निर्माता व कलाकार हे सर्व मराठवाड्यातील असल्यामुळे एक विशेष आकर्षण या चित्रपटाच्या बाबतीत निर्माण झाले आहे

टिप्पण्या