Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी सभापती मुंडे यांनी केली पाहणी

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी सभापती मुंडे यांनी केली पाहणी

----------–--------////--------////------------------
परभणी (प्रतिनिधी)
मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी श्रीनिवास ग्यानदेवराव मुंडे कृषी व पशुसंवर्धन सभापती  जिल्हा परिषद परभणी यांनी थेट तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सविस्तर माहिती घेत आहेत.
सविस्तर माहिती अशी की  परभणी जिल्ह्यातील  बहुतांश भागांमध्ये  शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक निघून गेले आता त्यांना आधार उरला नाही त्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सभापती धावले आहेत.आज सकाळी कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी तहसीलदार कंकळ , मंडळ अधिकारी लटपटे यांना सोबत घेऊन राणीसावरगाव भागातील पिंपळदरी, बोर्डा, सुपा, खोकलेवाडी आदी गावातील पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा ते जाणून घेत आहेत. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. अशा बोलक्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत होते परभणी जिल्ह्यातील बहुतेक करून सर्वच नुकसानग्रस्त भागाला भेट देण्याच्या प्रयत्न करणार आहोत दरम्यान, राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी श्रीनिवास ग्यानदेवराव मुंडे कृषी व पशुसंवर्धन सभापती  जिल्हा परिषद परभणी यांनी केली आहे.