मुख्य सामग्रीवर वगळा

संत जनाबाई विद्यालयात संविधान दिन साजरा


संत जनाबाई विद्यालयात संविधान दिन साजरा

गंगाखेड (प्रतिनिधी) गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी 26/11 ला शहिद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस.ए.केंद्रे हे होते तर प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव मुंढे (प्रा.मु.अ.)पर्यवेक्षक श्री व्ही.एस.फड ,ए. टी. गुट्टे , एस. बी.केंद्रे, बी.ए.नागरगोजे,केंद्रे आधीच उपस्थित होते यावेळी संविधानाच्या मूल्यावर प्रकाश टाकण्यात आला, यात बी.ए. नागरगोजे,बी.वाय. केंद्रे ,श्री माळवे आदी शिक्षकांनी आपले अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थीनी गीते गाऊन उपस्थितांची मने जिंकली, तर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कु .अर्पिता भालेराव,वैष्णवी कुरवरे , पायल वाव्हळे, सोनाली गायकवाड, झुरे गणेश, महेश मुंढे, सुमित साळवे,ई. विध्यार्थी आपले विचार मांडले.विशेष म्हणजे संविधान दिनानिमित्त  निबंध स्पर्धा व संविधानावर भिंती पत्रक बनवून त्याचे प्रकाशन करण्यात आले यावेळी संविधान घोषवाक्य देण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक प्रमुख श्रीमंगले व साबणे यांनी केले. तर  आभार शिवाजी महामुने यांनी केले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

टिप्पण्या