मुख्य सामग्रीवर वगळा

शिवसेनेच्या हातून गेली वेळ ; महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट?

मुंबई: सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला वेळ वाढवून देण्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नकार दिल्याने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम असून राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.दिवसभरातील वेगवान घडामोडीनंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वालील नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचं आमंत्रण देतानाच आज सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यावर प्रतिसाद देण्यास सांगितलं होतं. त्यानुसार पावणेसात वाजताच्या सुमारास शिवसेना नेते राज्यपालांकडे पोहचले. शिवसेनेने राज्यपालांकडे आपल्या आमदारांचं सह्यांचं पत्र सादर केलं व सत्तेवर दावा सांगितला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यांच पत्र देण्यासाठी शिवसेनेने ४८ तासांचा वेळ वाढवून मागितला. मात्र, राज्यपालांनी हा वेळ वाढवून दिला नाही. त्याचवेळी शिवसेनेचा सत्तेवरील दावाही त्यांनी फेटाळला नाही.

टिप्पण्या