Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी :- बाप संघटनेची मागणी

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी :- बाप संघटनेची मागणी
राणीसावरगाव (प्रतिनिधी) परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान केले असून यामध्ये सोयाबीन,कापूस, मिरची, फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून या शेतकऱ्यांच्या शेत शिवाराची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २००००₹ विस हजार रुपये दुष्काळ मदतनिधी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी उपजिल्हाधिकारी गंगाखेड यांच्याकडे बळी बळीराजा अधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव गुट्टे यांनी केले आहे
सविस्तर माहिती अशी की मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामधील पिके सोयाबीन कापूस मिरची आदी पिकांचे नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप करून विमा लवकरात लवकर देण्यात यावा विमा कंपनीने शासनाकडे बोट दाखवत हात झटकून मोकळे होऊ नये असा बळीराजा आधिकार परिषदेने दम भरला आहे यावेळी मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी २००००₹ विस हजार रुपये दुष्काळ मदतनिधी देण्यात यावा असे निवेदन उपजिल्हाधिकारी गंगाखेड यांच्याकडे देण्यात आले आहे या निवेदन देताना बळीराजा अधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव गुट्टे यांच्यासह   बळीराजा अधिकार परिषदेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते