विमा कंपनीवर राज्यकर्ते आणि प्रशासन मेहरबान तालुक्यात एकच कर्मचारी असल्यामुळे पंचनामे होऊ शकत नाहीत:- भाई विष्णुपंत घोलप
*विमा कंपनीवर राज्यकर्ते आणि प्रशासन मेहरबान तालुक्यात एकच कर्मचारी असल्यामुळे पंचनामे होऊ शकत नाहीत.* :- भाई विष्णुपंत घोलप
पाटोदा ( प्रतिनिधी ) पाटोदा तालुक्यात विमा कंपनीचा एकच कर्मचारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे होऊ शकत नाहीत याला जबाबदार राज्यकर्ते आणि प्रशासन यांच्या मेहरबनीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळु शकत नसल्याचे मत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समितीचे सदस्य भाई विष्णुपंत घोलप यांनी पाटोदा उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे. पाटोदा तालुक्यात एक नगर पंचायत ५९ ग्रामपंचायती सहीत १०७ गावे आणि वाडया आहेत. तालुक्यातील पाटोदा, दासखेड, अंमळनेर, आणि थेरला अशी चार महसुल मंडळे असुन त्या मध्ये ८अ प्रमाणे जवळपास ५७ हजार शेतकरी खातेदार असुन या सर्वाना अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला आहे. त्या मुळे शेतकरी पूर्णतः आर्थीक दृष्टया हतबल झालेला असुन त्याना शासनाचे अनुदान व १०० टक्के विमा मिळाला पाहिजे. शिवाजी बापुराव तांबारे या शेतकऱ्यांनी दि. २३ / १० / २०१९ ला अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाचा पंचनामा करण्यासाठी अर्ज केला तरी मागील पंधरा दिवसात एक ही संयुक्त पंचनामा तालुक्यात झालेला नसुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन दि. ६ / ११ / २०१९ अखेर पर्यंत पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत. एक तर तालुक्यात तलाठयांची संख्या कमी तसेच कृषी सहाय्यक ही कमी आणि विमा कंपनीचा तर एकच माणूस तो ही शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात गुंतला असल्यामुळे ( अग्रीकल्चर इन्सुरेन्स कंपनी ) विमा कंपनीची पंचनामा झाल्याची हमी लेखी स्वरुपात कोण देणार हा सगळा सावळा गोंधळ असुन शेतकऱ्या बद्दल राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा किती संवेदनशिल आहे हे या वरुन कळते. त्या साठी शासनाने तात्काळ विमा कंपनीची यत्रंणा कामाला लावण्यासाठी आणि महुसलचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि विमा कंपनीचा एक कर्मचारी असा संयुक्त पंचनामा शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाचा करण्यात यावा. नसता विमा कंपनी व शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक उफाळून येईल अशा प्रकारचे लेखी निवेदन देऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई विष्णुपंत घोलप यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना कळविले आहे.

टिप्पण्या