Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार: उद्धव ठाकरे

बळीराजाची इच्छा असेल तर सरकार आपलंच येईल आणि या राज्याला शिवसेनेचाच मुख्यमंत्री मिळेल, असे महत्त्वपूर्ण विधान करतानाच आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आश्वस्त केलं.लातूर आणि नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून उद्धव ठाकरे यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात खंडाळी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना उपस्थित शेतकऱ्यांनी आम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा, असे सांगितले. राज्यात शिवसेनेचं सरकार आल्यावर निश्चितच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेल, अशी आम्हाला आशा आहे, असा सूर शेतकऱ्यांमधून लावण्यात आला. त्यावर उद्धव यांनीही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे सांगून टाकले.