Loading Date... / mahasanvad  • किंमत: मोफत • पाने: १२
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ताज्या बातम्या लोड होत आहेत... (Loading latest news...)

मंत्र्यांकडून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागात भेट देऊन आलेल्या मंत्र्यांकडून आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला. मंत्र्यांनी आपआपल्या क्षेत्रातील माहिती देऊन आपले मत, सूचना या बैठकीत मांडल्या. मंत्री श्री चंद्रकांत पाटील, श्री दिवाकर रावते, श्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, श्री विनोद तावडे, श्री सुधीर मुनगंटीवार, श्री गिरीश महाजन, श्री रामदास कदम, श्री राधाकृष्ण विखे पाटील, श्री चंद्रशेखर बावनकुळे, श्री बबनराव लोणीकर, श्री दीपक केसरकर, श्री विजय शिवतारे, डॉ. अनिल बोंडे, श्री सुभाष देशमुख, श्री आशीष शेलार, श्री सदाभाऊ खोत, श्री महादेव जानकर, श्री दादाजी भुसे आणि अन्य मंत्री यावेळी उपस्थित होते.
दुष्काळाच्या काळात ज्याप्रमाणे उपाययोजना जाहीर करण्यात येतात, त्याचप्रकारच्या उपाययोजना या काळात जाहीर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. शेतकर्‍यांना मदतीचा हप्ता तत्काळ देण्यात यावा आणि ती रक्कम कर्जखात्यात जाऊ नये, जेणेकरून प्रत्यक्ष शेतकर्‍याच्या हाती मदत मिळेल, असे निर्देश त्यांनी दिले. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या सर्व शेतांमध्ये सफाईच्या दृष्टीने रोजगार हमीची योजना प्रारंभ करण्यात यावी. सुमारे 50 लाख शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असल्याने, विमा कंपन्यांशी योग्य समन्वय करून अधिकाधिक शेतकर्‍यांना लाभ मिळेल, हे सुनिश्चित करणे, हा अवकाळी पाऊस गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक असल्याने आगामी

काळाचे आर्थिक नियोजन करताना शेतकर्‍यांना मदत ही सर्वोच्च प्राथमिकता ठेवणे, शेतमजुरांसाठी अन्नसुरक्षेसह विविध उपाय हाती घेणे, असे निर्देश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.