बार्टीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्टीच्या अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांकरीता विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि खेळांचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असून दि. 22 डिसेंबर 1978 पासून ही संस्था महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील वंचित घटकांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्याय व समतेवरील जीवनकार्याची माहिती विविध माध्यमांदवारे जनसामान्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
दि. 22 डिसेंबर 2019 रोजी बार्टीच्या 41 व्या वर्धापन दिनानिमित्त बार्टीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच बार्टी संचालित सफाई कामगारांच्या मुला-मुलींकरीता चालविण्यात येणाऱ्या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमांत आणि मैदानी खेळांत सहभागी होऊन वर्धापन दिन साजरा केला.
सदर दिवशी बार्टी संचालित निवासी शाळेतील विद्यार्थ्यांकरीता 24 तास वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता शाळेच्या येरवडा येथील संकुलात कायमस्वरूपी “बार्टी क्लिनिक” चे उदघाटन बार्टीचे मा. महासंचालक, कैलास कणसे, भापोसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बार्टीच्या चतुर्थ श्रेणीतील चार कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात कल्पना अवचरे, सफाई कामगार, मारूती, मेमाने, शिपाई, विश्वनाथ धोंडगे, वाहनचालक आणि अमोल राऊत, माळी यांचा समावेश होता. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन पुरस्कार्थींना मा. महासंचालकांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच खेळात व विविध गुणदर्शन कार्यक्रमात विजयी गटांचे मा. महासंचालक यांच्या हस्ते फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बार्टीचे मा. निबंधक, यादव गायकवाड व बार्टीच्या इतर सर्व विभागांचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना बार्टीचे मा. महासंचालक, श्री. कैलास कणसे, म्हणाले की, सूर्य ज्याप्रमाणे इतरांना प्रकाश देण्यासाठी स्वत: जळतो त्याप्रमाणे प्रत्येकाने कष्ट घेऊन इतरांच्या उन्नतीसाठी झटावे. जो वंचितांच्या उन्नतीसाठी झटणार नाही त्याचे जीवन व्यर्थ गेल्यासारखे आहे. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाचा आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यकमाची प्रस्तावना भीमराव पारखे, प्रकल्प संचालक, बार्टी येरवडा संकुल व्यवस्थापन यांनी केले. आभारप्रदर्शन एल.बी. महाजन, प्रकल्प संचालक, सी.व्ही.सी. विभाग, बार्टी, पुणे यांनी केले. सूत्रसंचालन आरती डोळस, प्रकल्प संचालक, प्रकाशन व प्रसिध्दी विभाग यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीकरीता डॉ. पदमश्री पाटील, प्रकल्प व्यवस्थापक, प्रसिध्दी विभाग, सुरेश शिंदे, मुख्याध्यापक, जयश्री चेंडके, मुख्याध्यापिका, सुनिता भोसले, भांडार व्यवस्थापक, जितेंद्र धेंडे, क्रिडा शिक्षक निरज इनामदार, सहाय्यक क्रिडा शिक्षक, जीवन गायकवाड, प्रकल्प अधिकारी, सी.व्ही.सी, हेल्पलाईन मोना फाजगे, संशोधन अधिकारी, या बार्टीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीयरित्या काम पाहिले.

टिप्पण्या