मुख्य सामग्रीवर वगळा

पंतप्रधान पीक विमा योजनेतुन बीड जिल्हा वंचित ठेवल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालया समोर संबुळे वाजवत धरणे

*पंतप्रधान पीक विमा योजनेतुन बीड जिल्हा वंचित ठेवल्यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी कार्यालया समोर संबुळे वाजवत धरणे
*
पाटोदा *(प्रतिनिधी )* बीड  जिल्हयातील शेतकरी पिक विमा योजनेच्या निविदा कोणत्याही विमा कंपनीने न भरल्यामुळे बीड जिल्हयातील शेतकरी हंगामी पिक विम्यापासुन वंचीत राहु शकतात . त्यामुळे सदर कंपन्यांना केंद्र शासनाने बीड जिल्हा सामावुन घ्यावा यामुळे प्रशासनाला जागे करण्यासाठी पाटोदा उपजिल्हा अधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ / १२ / २०१९ रोजी सकाळी ११ .०० वा आय काँग्रेस कम्युनिस्ट शेकापा यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे धरणे अंदोलन व सबुळे वादन अंदोलन करण्यात आले यावेळी कॉग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे, यांनी सांगितले जर शासनाने पंतप्रधान पिक विमा योजनेत  बीड जिल्ह्याचा समावेश केला नाही तर पूर्ण तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरून  मोठे आंदोलन उभा करतील कॉ महादेव नागरगोजे यांनी केंद्र शासनाचा जाहीर निषेध करीत मोदी सरकार हे  शेतकऱ्याच्या विरोधात आहे असे सांगितले भाई विष्णूपंत यांनी स्थानिक आमदाराला प्रश्न लावून धरण्यास भाग पाडू असे सांगितले तर युवानेते उमर चाऊस यांनी सांगितले प्रश्न शेतकऱ्यांचा   आहे हे सरकार कोणतेही असो आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरू राजाभाऊ देशमुख यांनी विमा संदर्भात सर्व माहिती सांगितली दादाराव बांगर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी इक्बाल पेंटर यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले व संबुळे वादन करून आंबेडकर चौकातून घोषणाबाजी करून जिल्हा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला व अधिकारी मोरे यांच्याकडे निवेदन दिले यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष गणेश कवडे ,कॉम्रेड महादेव नागरगोजे, भाई विष्णुपंत घोलप ,काँग्रेस युवा नेते उमर चाऊस  चक्रपाणि जाधव, बाबुराव जाधव, सज्जाद भाई ,नामदेव सानप,  राहुल बामदळे, आजिनाथ घुमरे ,अनिल भोसले ,बबनराव भोसले युवराज जाधव ,योगेश ढवळे, बाबासाहेब घुमरे मदन बाप्पा घुमरे, अण्णा  राऊत, योगेश गाडेकर, चांगदेव निंबाळकर ,दीपक शिंदे ,मुज्जू भाई ,प्रशांत नाईकनवरे, देविदास काळे, अजीम शेख ,विठ्ठल चौरे ,दादा जावळे, चंद्रकांत दळवी, दिलीप चव्हाण जायभाय यांच्यासह शेकडो शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते हजर होते

टिप्पण्या