मुख्य सामग्रीवर वगळा

बीड जिल्हयात पाटोदा तालुक्यासहीत पिक विमा योजनेत समावेश करा नसता तिव्र अंदोलन करणार* :- कॉ . महादेव नागरगोजे

*बीड जिल्हयात पाटोदा तालुक्यासहीत पिक विमा योजनेत समावेश करा नसता तिव्र अंदोलन करणार* :- कॉ . महादेव नागरगोजे

पाटोदा ( प्रतिनिधी ) :- बीड जिल्हयात शेतकरी पिक विमा योजनेच्या निविदा कोणत्या ही विमा कंपनीने न भरल्यामुळे जिल्हयातील शेतकरी रब्बी हंगामातील सन २०१९ - २०२० च्या पिक विम्यापासुन वंचीत राहु शकतात, त्या मुळे सदर कंपन्यांना निर्देशित करुन शेतकऱ्याचे पिक विमे तात्काळ भरुन घ्यावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवुन दयावा, नसता जिल्हयात भारतीय कम्युनिष्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन कॉ. महादेव नागरगोजे यांनी दिले आहे.
बीड जिल्हयात गेल्या खरीपाच्या पेरणी साठी आवर्शन म्हणजे कोरडया दुष्काळा मुळे शेतकऱ्याचे कापुस, सोयाबीन, उडीद, मुग, बाजरी इत्यादी सर्व पिके वाया गेली व शेतात जी थोडी फार पिके राहिली होती ती परतीच्या अतिवृष्टीच्या वादळी पावसाने पुर्ण उधवस्त होवुन वाहुन गेली. असे मिळुन शेतकऱ्याचे खरीप व रब्बी अशी दोन्ही ही पिके पुर्ण वाया गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणींना तोंड देत असुन तो गतीने आत्महत्याकडे वाटचाल करता आहे. एकंदरीत बीड जिल्हयात आधी कोरड्या व नंतर ओल्या दुष्काळाशी सामना करावा लागत असुन मात्र आताचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे साहेब व त्यांचे सहा कॅबिनेट मंत्री बघ्याची भुमिका घेत असुन पुढील मंत्रीमंडळ कसे निवडता येईल यात ते पुर्णतः गुंतलेले आहेत. त्या मुळे बीड जिल्हयातील शेतकरी संभ्रमात असुन विमा प्रक्रिया सुरु होण्याच्या संभ्रमात आहे. तरी खालील मागण्याची सोडवणुक न केल्यास तिव्र अशा स्वरुपाचे अंदोलन छेडले जाईल.  सन २०१९ - २०२० रब्बी हंगामातील पिकविम्यासाठी कंपन्यांना निर्देशित करून पिक विमा त्वरीत भरुन घ्यावा. , सन २०१७ च्या खरीप पिक विम्याचे त्वरीत वाटप करा व त्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करा.,  अतिवृष्टीची नुकसान भरपाई म्हणुन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५०,००० / - रुपये अनुदान तात्काळ दया. सन २०१९ च्या खरीप पिकविम्याचे त्वरीत वाटप करा., पाटोदा व शिरुर (का.) विधान सभेचा स्वतंत्र मतदार संघ करा. तरी वरील मागण्याची सोडवणुक न केल्यास तिव्र असे अंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन पाटोदा तहसीलदार यांना कॉ. महादेव नागरगोजे यांनी दिलेले आहे. या निवेदनावर राजाभाऊ देशमुख, काँग्रेसचे पाटोदा तालुका अध्यक्ष गणेश कवडे, नामदेव सानप, चाऊस पठाण, अंगद सानप, पवळ, पोपट पवार यांच्या सह्या आहेत.

टिप्पण्या