मुख्य सामग्रीवर वगळा

कहा है प्रधान मंत्री फसल बिमा योजना:- भाई विष्णुपंत घोलप

*कहा है प्रधान मंत्री फसल बिमा योजना!* :- भाई विष्णुपंत घोलप

पाटोदा ( प्रतिनिधी ):- रब्बीची पेरणी जवळ पास ९० % संपली आहे आम्हा शेतकऱ्यांना २०१९-२० चा रब्बी पिकाचा विमा भरावयाचा आहे - कुठे आहे प्रधानमंत्री पिकविमा योजना याची माहिती मिळणे साठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई विष्णुपत घोलप यानी तहसिल कार्यालय ता.पाटोदा यांच्या कडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
 रब्बी पिकाची पेरणी साधारणतः हस्त नक्षत्र चित्रा नक्षत्र आणि स्वाती नक्षत्रात होते. किवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबर अखेर पर्यंत किंवा जास्तीत जास्त नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होते. त्या प्रमाणेच शेतकऱ्यांनी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात रब्बीची पेरणी केली. आणि ऑक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवाड्यात अवकाळी आणि सततच्या पावसाने पेरणी झालेली पिके वाया गेली, त्या मध्ये पेरणी केलेल्या हरबऱ्याचे संपूर्ण नुकसान झाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विमा कवच दिलेले आहे. मागील वर्षी रब्बी पिकाची विमा भरण्याची सुरुवात ०१ ऑक्टोबर ते आंतीम तारीख ३१ डिसेंबर अशी होती. आज ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना सुध्दा संपला आहे. शासनाने प्रधानमंत्री पिकविमा योजना लागु करुन भारतीय कृषी विमा कंपनी आणि तिच्या अधिपत्याखालील सर्व विमाकंपन्या आज बीड जिल्हात २०१९-२० सालातील रब्बीचा पिकविमा भरुन घेत नसतील तर शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजना कुचकामी ठरेल, शेतकऱ्यांच्या संकटकाळात शासनाने तात्काळ वरील योजनेची अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना विमा कवच मिळून द्यावे. नसता शेतकरी म्हणत आहेत, " कहा है प्रधानमंत्री फसल बिमा योजना " हमे २०१९-२० साल का फसल विमा भरणा है...! अशा प्रकारची मागणी शे.का.प.चे भाई विष्णुपंत घोलप यांनी तहसिल कार्यालय पाटोदा यांना लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

टिप्पण्या