मुख्य सामग्रीवर वगळा

पाटोदयात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा उडाला बोजवारा. एस.डी.ई चे दुर्लक्ष

पाटोदयात बीएसएनएलच्या इंटरनेट सेवेचा उडाला बोजवारा. एस.डी.ई चे दुर्लक्ष


( पाटोदा प्रतिनिधी) :-  शहरासह तालुक्यात बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. सतत खंडित होणाऱ्या सेवा तसेच कार्यालयात इंटरनेट चालत नसल्यामुळे आॕनलाईन असणारी कामे होत नाहीत . अशा अनेक समस्यामुळे बीएसएनएलच्या कारभाराचा पाटोदयातील नागरिकांना फटका सहन करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.याकडे माञ पाटोदा कार्यालयातील एस.डी.ई.हे लक्ष देत नसुन.

पाटोदा  शहरासह तालुक्यात बीएसएनएलच्या मोबाईल व ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवेचे तीनतेरा वाजल्यामुळे नागरिकांना फटका बसत आहे. बीएसएनएलच्या अनागोंदी कारभाराचा पाढाच वाचायची वेळ आली आहे. कॉल ड्रॉपच्या समस्येने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. फोरजी नेटवर्क  हे चालत नसुन याचा फटका नागरिकांसह व्यापार्‍यांचेही हाल होत आहेत. अन्य मोबाईल कंपन्यांचे कॉल व्यवस्थित सुरू असून बीएसएनलच्या बाबतीत कोणती समस्या निर्माण झाली हे कळेनासे झाले आहे. ग्रामीण भागात तर नेहमीच संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहे, पुन्हा प्रयत्न करा  असे उत्तर नागरिकांना ऐकावे लागत आहे.
       यामध्ये उद्योजक आणि व्यावसायिकांना जास्त त्रास सहन करावा लागत असुन या वर्षात अनेकदा ब्रॉडबॅण्ड सेवेच्या गलथान कारभाराचा फटका सर्वच ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. एकीकडे "फोर जी'सेवा आसुन आडचण नसुन खोळंबा, तर. गेल्या काही दिवसापासून बीएसएनएल कंपनीची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.   बहुतांश वेळा गतीने इंटरनेट सुविधा मिळत नाही. अतिशय संथगतीने इंटरनेट सुरू असते. मोबाईलवर इंटरनेटची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना तर यापेक्षा वाईट अुनभव येतो. मोबाईलरवही संथगतीने इंटरनेट उपलब्ध होत असुन गेले अनेक महिन्यापासून शहरासह तालुक्यातील बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे.आसुन याखडे माञ पाटोदा कार्यालयातील एस. डी.ई. हे दुर्लक्ष करतात तसेच ते कार्यालयात ही दिसत नसुन फोनवर विचारले तर उडवाउडवीची उत्तरे देतात तरी याकडे जिल्हाधिकारी यानी लक्ष दयावे.

टिप्पण्या