मुख्य सामग्रीवर वगळा

चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी

*चंद्रपूर-मूल रोडवर भीषण अपघात दोघे जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी*

                             - चंद्रपूर-मूल रोडवर आज दिनांक 23 ला  सकाळी 11 वाजता दरम्यान झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर स्वार
चालक प्रितम सुरेश शेजूळे वय  २० वर्ष व प्रफुल प्रभाकर शेलोटे वय १९ दोघेही राहणार लोहारा कँप चंद्रपूर या दोघांचा जागीच म्रुत्यु झाला. तर दुसऱ्या एका दुचाकी स्वार सुरेश सुखदेव राऊत वय ३० वर्ष आणि नीलेश लहानु मांढरे वय २३ वर्ष दोघेही राहणार सुशी तालूका मूल गंभीर जखमी झाले. जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.  मिळालेल्या माहिती नुसार चंद्रपूर कडुन मूल कडे येणारी नारायणा विद्यालय,चंद्रपूर ची स्कूलबस क्रं. एमएच ३४ ए ८३६२ ही मूल पासुन 5 किमी अंतरावर असलेल्या एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रं. एमएच ३४ एएक्स ९८९१ वाहनाला धडकली. यात दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले. बस दुचाकीला धडकल्याने बसचालकाचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटले. दुचाकी मागून म्हशी घेऊन येणाऱ्या पीकअप क्रं. एमएच ३४ बीजी ५००४ या वाहनाला धडक दिली. यात एक म्हैस जागीच ठार झाली तर दोन म्हशी गंभीर जखमी झाल्या. म्हशी नेणाऱ्या वाहनाच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका दुचाकी क्रं. एमएच ३४ यू ६८२६ चालकाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केले मात्र गंभीर जखमी झाले. म्हशी नेणाऱ्या वाहनाला धडक दिल्यानंतर बस चालकाने एका झाडाला धडक दिली. अपघात झालेल्या बसमध्ये मोठ्याप्रमाणात प्रवासी होते. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.



मनोज गोरे चंद्रपूर

टिप्पण्या