*पाटोदा युवावक्ता स्पर्धेचे गणेश जरे, प्राची शिंदे, शितल सांगळे ठरले मानकरी
.*
पाटोदा ( प्रतिनिधी ):- माणुसकीची भिंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,पाटोदा यांच्या वतीने पी.व्ही.पी.कॉलेज पाटोदा या ठिकाणी पाटोदा युवा कोण या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक समान गुण पडल्यामुळे तीन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आले, व ट्रॉफी चिठ्या टाकून विजेत्यास देण्यात आली. गणेश जरे, प्राची शिंदे, शितल सांगळे व द्वितीय क्रमांक शेख आयशा अफसर तांबोळी, तृतीय क्रमांक समान गुणामुळे दोन विद्यार्थ्यांना विभागून देण्यात आला. काकडे अनुजा, सरोदे ऋतुजा व ट्रॉफी चिठ्ठी टाकून विजेत्यास देण्यात आली. व चौथा क्रमांक हरिओम गवळी याने पटकावला व सर्वात उत्कृष्ट भाषण दत्ता हुले यांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटक शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म. द.क्षिरसागर सर, प्रमुख अतिथी
शिवव्याख्याते गणेश भोसले हे होते, प्रमुख उपस्थिती प्राचार्य आघाव सर, पटाईत सर, टाकणकर सर, डॉ.रविंद्र गोरे, सय्यद सज्जाद, लक्ष्मण सस्ते, नवनाथ साळुके, अरुण पवार हे होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.प्रदीप मांजरे सर व डॉ.सय्यद शानुर सर, काशीद सर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ता देशमाने यांनी केली. या वेळी गणेश भोसले व शिवव्याख्याते ज्ञानदेव काशीद सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली. या वेळी प्राचार्य आघाव सर, म. द.क्षीरसागर सर, सय्यद सज्जाद, लक्ष्मण सस्ते, डॉ.रविंद्र गोरे यांनी देखील मार्गदर्शन केले. या वेळी दत्त जयंतीचे औचित्य साधून आज पर्यंत केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून तीन ही दत्ता देशमाने, दत्ता वाघमारे, दत्ता हुले यांचा सत्कार म. द.क्षिरसागर सरांनी केला. या स्पर्धे साठी प्रथम पारितोषिक ५०००/- रुपये सामूहिक लक्ष्मण सस्ते, नवनाथ साळुके, किरण आवढाळ, रामदास भाकरे, गणेश भोसले शिवव्याख्याते व प्रवीण भैय्या जायभाये यांच्या स्मरणार्थ विजयाताई जायभाये यांनी बक्षीस दिले होते. व द्वितीय पारितोषिक ३०००/- रुपये मयूर भैय्या जाधव यांनी दिले होते. व तृतीय पारितोषिक २०००/- रुपये रामभाऊ सानप वडझरी ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले, चौथे पारितोषिक कै.मिनाक्षी नंदकुमार कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वैभव कुलकर्णी यांनी दिले. व ट्रॉफीचे सौजन्य अरुण पवार एल.आय.सी.विमा प्रतिनिधी यांनी केले होते. या स्पर्धेचे बहारदार सूत्रसंचालन तुकाराम रंधवे सर यांनी केले. आयोजन माणुसकीची भिंत दत्ता देशमाने रामदास भाकरे दत्ता वाघमारे यांनी केले होते.

टिप्पण्या