मुख्य सामग्रीवर वगळा

धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रँड नेते, आक्रमक वक्ते, संघटक धनंजय मुंडे यांना मंत्रिपद
मिळणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना मंत्रिपद मिळणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु होती. मात्र आज राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पत्रकारांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पक्षाच्यावतीने मुंडे यांचा बायोडेटा पाठवण्यात आला आहे. ज्या नेत्यांचे मंत्रिपद ठरले आहे. त्यांचा बायोडेटा या ग्रुपवर पाठवण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, आदिती तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्या बायोडेटाचा समावेश आहे. जिल्हा परिषद सदस्यापासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ते मंत्री असा दिर्घ आणि संघर्षमय असा प्रवास मुंडे यांनी आपल्या कारकिर्दीत केला आहे.
धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता या नात्याने पक्ष वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सरकारवर आसूड ओढण्याची एकही संधी मुंडे यांनी विरोधी पक्षनेता असताना सोडली नव्हती. तसेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे केले होते. त्याआधी शिवस्वराज्य यात्रा, परिवर्तन यात्रा, हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानेही मुंडे यांनी राज्यव्यापी दौरे करत आपल्या मुलुखमैदानी तोफेने युवकांमध्ये उत्साह भरला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडे तरुणांना आकर्षित करण्यात मुंडेंचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याचेच फळ म्हणून आता पक्षातर्फे त्यांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले ज्यभरात आपल्या नेतृत्व गुणांनी जनसामान्यांमध्ये आपली प्रतिमा बनवत असताना स्वतःच्या मतदारसंघावरही मुंडेंची मजबूत पकड होती. थेट लोकांमध्ये जाऊन काम करणे, तगडा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मजबूत फळी याच्या जोरावर धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी – गृहमंत्री अमित शहा उदयनराजे, यांच्या सभा विरोधात होऊनही राज्यभर गाजलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा तब्बल ३२००० मतांनी पराभव केला. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील 6 पैकी 4 जागांवर पक्षाचे आमदार निवडून आणले आहेत.

टिप्पण्या