*युवा बौद्ध धम्म परिषदची भूमिका
*
अनेक संघटनांपैकी एक व्हावे असे न होता दिशादर्शक कृतीकार्यक्रम राबवण्यासाठी एक विशेष विचारमंच मिळावा म्हणून 8 जानेवारी 2017 रोजी देशातील पहिली युवा बौद्ध धम्म परिषद हुपरी ता हातकणंगले जि कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे घेवून या मंचाची स्थापना केली गेली. युवा बौद्ध धम्मपरिषद ही संकल्पना व तिची भूमिका स्पष्ट व्हावीयासाठी हा लेखप्रपंच!
*१) बौद्ध परंपरेचा शोध व प्रचार* : - भारतात बौद्ध धम्माचा प्रभावकाळ संपल्यानंतर तो नष्ट झाला, असे झालेले नाही तर त्याचा प्रभाव अंतःप्रवाहात अस्तित्वात राहिला होता व आजही आहे. त्या प्रवाहाला उजागर करुन त्याचा प्रचार आणि प्रसार करणे हे अतिशय महत्वपूर्ण कार्य आहे त्यावर युवा बौद्ध धम्म परिषद कार्य करत आहे. यासाठी बळीराज हे बुद्धपूर्व बुद्ध असल्याचे मान्य करुन या महामानवाबद्दल कृतज्ञता बाळगून हा प्रवाह प्रचारात आणत आहोत . त्याचबरोबर सम्राट अशोका नंतर हा प्रवाह खंडीत झाला की काय? असेच भारताच्या इतिहासाची मांडणी केली गेली आहे. त्यामुळे संतांवर तथागत बुद्धांचा प्रभाव होता याचेही पुरावे मिळतात तसेच छ . शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज, म. फुले, राजर्षि शाहू महाराज, छ. सयाजीराव गायकवाड यांच्यावरही प्रभाव होता हे सिद्ध होते. त्यामुळे या सर्व महामानवांना बौद्ध धम्मातील विशेषणे बहाल करणे गरजेचे आहे. म्हणून आम्ही दि. 28 जानेवारी 2018 रोजी हुपरी येथे झालेल्या दुसरी युवा बौद्ध धम्म परिषदमधे छ. शिवराय, छ. संभाजी महाराज, छ. शाहू महाराज, छ. सयाजीराव गायकवाड यांना धम्मधर व राष्ट्रपिता म . फुले यांना ''आधुनिक महाकारुणीक" तसेच डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना ''आधुनिक बुद्ध'' घोषित केले. ही परंपरा शोधुन तिचा प्रचार करण्याचाच हा एक प्रयत्न आहे.
*२) धम्मचर्चा घडवणे*: -
तथागत म्हणतात, " वेळोवेळी धम्मचर्चा करणे व ऐकणे हे उत्तम मंगल होय. त्यांच्या मार्गदर्शनास अनुसरून आधुनिक बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथांवर "धम्मचर्चा घडवून त्यांच्या विचारांचा जागर करणे या उद्देशाने अनेक ठिकाणी अशा धम्मचर्चा घडवून आणल्या. बुद्ध आणि त्यांचा धम्म - हातकणंगले, जि. कोल्हापुर, जातीव्यवस्थेचे निर्मूलन - हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, क्रांती आणि प्रतिक्रांती - इचलकरजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर, बुद्ध की कार्ल मार्क्स - नवे पारगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापुर, शूद्र पूर्वी कोण होते? मांगूर, ता. निपाणी, जि. बेळगाव, भारतातील जाती - हळदी, ता. करवीर जि. कोल्हापुर, मुक्ती कोन पथे? - बारवाड , ता. निपाणी जि. बेळगाव, तसेच आधुनिक महाकारुणीक म. फुले लिखित सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक - हेरले ता. हातकणंगले जि. कोल्हापुर या विविध ठिकाणी संपन्न झाल्या. यामधे महिनाभर या ग्रंथांचा अभ्यास करुन वेगवेगळे धम्म अभ्यासक आपले विवेचन करतात .
*३) दर रविवार जावूया बुद्ध विहार*: -
आधुनिक बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी " प्रत्येक बौद्धाने दर रविवार बुद्ध विहारात गेले पाहिजे ! " अशी सुचना वा मार्गदर्शन केले आहे हे सर्वश्रुत आहे. त्यानुसार दर रविवार जाऊ बुद्ध विहार " हे अभियान युवा बौद्ध धम्म परिषद ने हाती घेतले व त्याचा प्रचार -प्रसार सुरु केला ''गांव तिथे बुद्ध विहार व विहार तिथे ग्रंथालय" अशी मोहिम हाती घेवून लोकसहभागातुन विहारे व ग्रंथालये सुरु करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू आहे. यामधे हुपरी, हेरले ता. हातकणंगले जि. कोल्हापुर., हळदी, गर्जन, आडूर, आरे ता. करवीर जि. कोल्हापुर., अकिवाट ता. शिरोळ जि . कोल्हापूर., गिरोली, वारणानगर ता. पन्हाळा जि. कोल्हापूर, मांगूर, बोरगांव ता. निपाणी जि. बेळगांव येथे उपलब्ध इमारतींमधे विहार व ग्रंथालये सुरु केली.
*४) कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा*: -
पौर्णिमेला बौद्ध धम्मामधे खुप श्रद्धेचे स्थान आहे. तो बौद्धांचा सणच आहे म्हणून त्याला मान्यता मिळवून देणे गरजेचे आहे तसेच पौर्णिमांचे झालेले ब्राह्मणीकरण दूर करायचे या दृष्टीने युवा बौद्ध धम्म परिषदने हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे प्रयोग म्हणून प्रत्येक पौर्णिमा ही 'कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा' या नावाने साजरा करण्यास सुरुवात केली. या नामकरणाने पोर्णिमा व तथागत बुद्धांचे नाते स्पष्ट होवून ब्राह्मणीकरणापासून मुक्तता होते. प्रत्येक पौर्णिमा च्या नावामागे व पुढे काही शब्द लावून हे ब्राह्मणीकरण केले असल्याने ते सर्व 'कल्याणमैत्री पौर्णिमा' या शब्दामुळे दूर केले जातील. तथागतांना एकदा विचारले गेले तुमचा धम्म कसा आहे त्यावर ते म्हणाले, माझा धम्म आदि कल्याणं, मध्य कल्याणं, अंत कल्याणं असा आहे तोच शब्द व त्यांनी जोपासलेली कल्याणमैत्री भावना पुढच्या पिढ्यांवर संस्कारीत करण्यासाठी प्रत्येक पौर्णिमा ही ''कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा" म्हणून साजरी करण्याची "बौद्ध परंपरा'' यायोगे रुढ करण्याचा युवा बौद्ध धम्म परिषद प्रयत्न करत आहे. लोक त्याचे स्वागत करत आहेत.
*५) बौद्धांचे सण-सोहळे रुढ करणे*: -
धम्म जेवढा बौद्धिक, विज्ञानवादी आहे तेवढाच तो भावात्मक विश्व फुलवणारा व जपणारा आहे हे वेळोवेळी केलेल्या उपदेशातुन तथागत यांनी स्पष्ट केले आहे. किसागोतमी यांना केलेल्या मार्गदर्शनातुन दिसते कि ती मृत मुलाला घेवून व्याकुळ हृदयी आक्रोश करत येते, मुलाला जीवंत करा, तथागत म्हणते पण तिला तथागत आल्या आल्या तत्वज्ञान सांगत नाहीत तर तिच्या भावनिक आवेगाला जाणून घेतात व मुठभर मोहरी अशा घरातुन आण ज्या घरातील कोणी मेले नाही असे सांगतात नंतर तिला सत्य कळते व ती उपासिका बनते. येथे मानवी भावनांचा आदर करूनच त्यांचे मार्गदर्शन करण्याचे धोरण तथागतांनी स्वीकारले आहे. त्याचे अनुसरण करून युवा बौद्ध धम्म परिषद बौद्धांना वेगवेगळ्या सण सोहळ्यांचा भावात्मक पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. यामधे "०८ जानेवारी विश्व बौद्ध धम्म तो ध्वज दिन'', ''बळीराजा कृतज्ञता महोत्सव", ''कल्याणमैत्री पौर्णिमा सोहळा'', ''चवदार जलोत्सव'', "०३ जानेवारी भारतीय शिक्षण दिन", "अशोक विजयादशमी", ''०७ नोव्हेंबर भारतीय विद्यार्थी दिन", "भारतीय विषमता दहन दिन'' (मनुस्मृति दहन) असे अनेक सण सोहळे साजरे करुन प्रचार-प्रसार करुन रूढ करण्याचा प्रयन युवा बौद्ध धम्म परिषद मार्फत केला जात असून दर ०८ जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा बौद्ध धम्म परिषद हुपरी. ता. हातकणंगले जि. कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे भरवून तो बौद्धांचा सण-सोहळा म्हणून साजरा करण्याचा ठराव करुन जाहिर केले. त्यापूर्वी हे सर्व सोहळे वर्षभर साजरे केले आणि आजही साजरे केले जातात.
*६)पाली (बौद्ध) शब्द रूढ करणे*: -
बोधिसत्व संत तुकोबारायांनी म्हटले आहे की, ''आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्र करू।" त्यानुसार बौद्ध परंपरेला पूरक असे पाली भाषेतील शब्द , त्यांचा मराठीत होणारा भावार्थ रुढ करून सांस्कृतिक युद्धात अग्रेसर होणे गरजेचे आहे त्यासाठी युवा बौद्ध धम्म परिषद "चालत रहा चालत रहा! ", "धम्मधर'', ''धम्मचर्चा'', ''धम्मचर्या'', "मुदितामंत्रण'', ''कल्याणमित्र'' आदि शब्दांचा वापर स्वतः करुन प्रसारित करत आहे जेणेकरुन पुढील पिढ्यांमध्ये "बुद्ध वाणी'' पाली शिकण्याची व समजून घेण्याची ओढ निर्माण होईल. तसेच सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत चालविला जाणारा पाली भाषा प्रमाणपत्र कोर्सही हुपरी ता. हातकणंगले जि. कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे युवा बौद्ध धम्म परिषद च्या पुढाकाराने सुरु करून, यशस्वी केला आहे.
*७) स्थानिक बौद्ध श्रद्धास्थाने व प्रेरणास्थळांचा प्रचार* : - लांब अंतरावर असणारी श्रद्धा व प्रेरणास्थळे तर वंदनीय व आवश्यक आहेतच पण आपल्याला धम्माची पकड जनसामान्यांच्या मनावर निर्माण करायची असेल तर स्थानिक श्रद्धास्थाने व प्रेरणास्थळे शोधून त्यांची महती शोधून प्रचारात आणणे गरजेचे आहे. त्यामुळे दूरवर असणा-या स्थळांना न जावू शकणारे पण निष्ठावान , श्रद्धावान जनसामान्य लोक, अपंग व आजारी लोक, वृद्ध स्त्रीया-पुरुष, लहान शाळकरी मुले-मुली यांना धम्माबद्दलची आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी पर्याय उपलब्ध होईल व त्यांना आपली चळवळीविषयी व धम्माविषयी आपला भावात्मक ऋणानुबंधही विकसित करता येईल. त्यासाठी हुपरी, ता. हातकणंगले जि. कोल्हापुर येथे आधुनिक बुद्ध, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी व चैत्यभूमीची प्रतिकृती रुपात स्मारक आहे. माणगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापुर राज्य महाराष्ट्र हे धम्मधर छ. शाहू महाराज व आधुनिक बुद्ध, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्याणमैत्रीचे व बाबासाहेब यांच्या राजकीय नेतृत्व घोषित झाल्याचे प्रेरणास्थळ व श्रद्धास्थान आहे अशी यांना ठराव करून मान्यता देवून युवा बौद्ध धम्म परिषद ने त्यांचे महत्व बिंबवण्याचा प्रयन सुरु केला आहे. त्यासंबंधीचा ठराव ०४ जानेवारी २०१७ रोजी केला आहे. तसेच पन्हाळा येथे बाबासाहेबांची जागा आहे, जी छ. राजाराम महाराजांनी २६ जानेवारी १९३५ रोजी प्रदान केली होती तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावे ही कार्यकर्त्यांची मागणी आहे तेथे दर २६ जानेवारी रोजी एकत्र येण्याचा ठराव २८ जानेवारी २०१८ रोजी हुपरी ता. हातकणंगले जि कोल्हापुर राज्य महाराष्ट्र येथे झालेल्या दुसऱ्या युवा बौद्ध धम्म परिषद मध्ये केला आहे. ही बौद्धांची प्रेरणास्थळे व श्रद्धास्थाने बनवण्यासाठी त्यांना नावारुपाला आणण्यासाठी त्या संदर्भातील कृतीकार्यक्रम केले जात आहेत. अशा प्रकारे कृतीकार्यक्रम स्वतः अमलात आणून त्यांचा प्रचार केला जात आहे. आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे धम्माचा मार्ग स्वतः अंगिकारून इतरांना समजावून सांगण्याचे धोरण स्वीकार करून युवा बौद्ध धम्म परिषद कार्यरत राहणार आहे.
*प्रा. किरण भोसले, संकलक युवा बौद्ध धम्म परिषद , महाराष्ट्र व कर्नाटक राज्य*
*संपर्क : 9527081615*

टिप्पण्या