03 डिसेंबर : पब्जी या मोबाईल गेममुळे चाकण परिसरातील एका तरुणाच्या डोक्यावर परिणाम झाला असून उच्चशिक्षित असलेल्या या तरुणाला नागरिकांनी चाकण पोलिसात पकडून दिलं आहे. या बातमीची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ज्या तरुणाच्या डोक्यावर पब्जीमुळे परिणाम झाला आहे त्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. याच नावामुळे या बातमीची जोरदार चर्चा सुरू आहे.अजित पवार असं या तरुणाचं नाव आहे. पब्जी गेम खेळून अजित पवारांच्या डोक्यावर परिणाम असं म्हटल्यावर आपल्याला नक्की आश्चर्य वाटेल. परंतु हे राजकारणातील नसून पुणे जिल्ह्यातील चाकणमध्ये सध्या वास्तव्यास असलेले उच्चशिक्षित तरुण आहेत. मूळचे इंदापूर तालुक्यातील टेंभुर्णी गावचे ते रहिवासी आहेत.
चाकणमधील हा तरुण पब्जी गेमच्या आहारी गेल्याने पब्जी गेम सारखेच सामान्य आयुष्यात वागू लागले.
चाकणमधील हा तरुण पब्जी गेमच्या आहारी गेल्याने पब्जी गेम सारखेच सामान्य आयुष्यात वागू लागले.

टिप्पण्या