मुख्य सामग्रीवर वगळा
मनोहर भिडेंना तुरुंगात पाठवा – आमदार प्रकाश गजभिये यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
यंदाचा कोरेगाव भीमा शौर्य दिन दिमाखात साजरा करू, कोणी गैर प्रकार करण्याचा प्रयत्न केल्यास सरकार त्यांची गय करणार नसल्याचं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी गजभिये यांना दिलं आहे. तसंच कुणी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला तर त्याची जागा सरकार दाखवून देईल असा स्पष्ट इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
कोरेगाव भीमा हिसांचारा मध्ये भिडे आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याचा वारंवार आरोप केला जातो. त्या पार्श्र्वभूमिवर या दोघांवर कारवाई करून शौर्य दिन साजरा करणासाठी देशभरातून येणाऱ्या बांधवांना सुरक्षा द्यावी. अशी मागणी गजभिये यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
कोरेगाव भीमा इथं जमणाऱ्या आंबेडकरी जनतेसाठी विविध सोयी उपलब्ध करून द्याव्या, भीमा कोरेगावकडे येणाऱ्या सर्व मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त ठेवावा. अशी मागणी गजभिये यांनी या निवेदनाद्वारे केली.
भिडे महिलांबद्दल नेहमीच अपमानजनक विधान करतात. त्याचा निषेधही प्रकाश गजभिये यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे आमदार अनिल परब, आमदार सुनिल प्रभू, सतीश गायकवाड, राजू मोरे, अनिल बोराडे, अमोल हिरे, तन्मय गावडे, मोहम्मद असिफ, अफजलभाई उपस्थित होते.
यापूर्वीही आमदार प्रकाश गजभिये यांनी सातत्याने भिडे, एकबोटे यांच्याविरुद्ध विधानपरिषद सभागृहात आणि सभागृहाबाहेर आवाज उठवला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर कोरेगाव – भीमा हिंसाचार प्रकरणी आंबेडकरी युवकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आणि पाठपुरावा देखील केला आहे.
टिप्पण्या