मुख्य सामग्रीवर वगळा

आमदार सुभाष धोटेंनी विधानसभेत मांडल्या राजुरा क्षेत्राच्या समस्या.

आमदार सुभाष धोटेंनी विधानसभेत मांडल्या राजुरा क्षेत्राच्या समस्या.

  महाराष्ट्र विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील अतिशय महत्त्वाचा विषयावर प्रश्न उपस्थित करून क्षेत्राच्या विकासासाठी विधानसभेचे लक्ष वेधले. क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रश्न उपस्थित करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज स्पष्ट केली.
         आमदार सुभाष धोटे यांनी  राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा मुख्यालयीन असलेले ३० खाटाचे रुग्णालय  १०० खाटात श्रेणी वर्दीत करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक असलेली पदे वैद्यकिय उपकरणे साहित्य व यंत्र सामग्री उपलब्ध करून तातडीने रुग्णालय सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुर असून त्यापैकी २ प्राथमिक आरोग्य केंद्रांची काम पूर्ण झालेले आहे. रुग्णालयात आवश्यक असलेली पदे, वैद्यकिय उपकरणे, साहित्य व यंत्र सामग्री उपलब्ध करून तातडीने उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली. चंद्रपूर जिल्यातील मुल तालुक्यातील खेडी ते गोंडपिपरी प्र. रा. मा. ९ व गोंडपिपरी पोडसा रा. मा. ३६९ व हिवरा, दरूर ते विठ्ठलवाडा (प्रतिमा ४८) रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी केली.  चंद्रपूर जिल्ह्यातील मुल खेडी गोंडपिपरी मार्गाचे ३९४.३६ कोटीच्या कामात अनियमितता होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. गोंडपिपरी येथील उपविभागीय कार्यालय गोंडपिपरीचे कार्यलय जिर्ण व मोडकीस असल्यामुळे कार्यालयाचे नवीन इमारत ताबळतोब बांधण्यात यावी अशी मागणी केली. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत शासनाने ६००रू. वरून १०००रू. तरतूद केली आहे परंतु लाभार्थीना ती मदत प्रत्येक महिन्यात न मिळता 3 किंवा ४ महिन्यांनी प्राप्त होते आहे. आजच्या महागाईच्या काळात १००० रू. खूप कमी आहे. १००० रू. वरून २००० रू. करण्यात यावे. तसेच  ते रुपये प्रत्येक महिन्याला देण्यात यावे अशी मागणी केली. क्षेत्रातील पाणी पुरवठा योजनेची अतिशय वाईट परीस्थिती असून पंधरा व वीस गावाची योजना असल्यामुळे व्यवस्थितरीत्या पाणी पुरवठा होत नाही. खूप जुन्या नळ योजनांमुळे कित्येक ठिकाणी पाईप लाईन खराब आहे. त्या पाईप लाईन दुरुस्त करण्यात याव्यात. जिवती तालुक्यातील आदिवासी दुर्गम आणि डोंगराळ परिसर असल्यामुळे पाण्याचे स्त्रोत मिळत नाही. त्यामुळे तिथल्या लोकांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. आणि पाणी पुरवठा विभागातील प्रशासकीय कर्मचारी तिथे जात नाहीत वरील अनेक समस्या बाबात ग्रामीण, अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा शहरी भागातील लोकांप्रमाणेच ६५ लिटर पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पावले उचलली जावित. अशा विविध महत्त्वाच्या विषयावर प्रश्न उपस्थित करून त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक मुद्द्यावर सभागृहाचे लक्ष वेधले.


 रिपोर्टर मनोज गोरे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

टिप्पण्या