बीडची सह्याद्री देवराई
बीडपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या पालवन जवळच्या डोंगरावर या माणसाने एक नव्हे दोन नव्हे, हजार नव्हे पाचशे नव्हे तर लाखो झाडांची लागवड केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांच्या कालखंडामध्ये या वृक्षांच्या लागवडीबाबत जोपासना करण्याचे धोरणही सयाजीरावांनी आखल्यामुळे आज त्या डोंगरामध्ये हजारो झाडे हे डोक्यापर्यंत गेले आहेत. कालपर्यंत त्या झाडांना जोपासले जात होते, परंतु आता ती झाडे माणसांना जोपासू पहात आहे. असेच लाखो झाडे जोपासण्यासाठी, जगवण्यासाठी सयाजीरावांची धडपड सुरू आहे. त्यांच्या सोबत बीड बाहेरचेच अनेक प्रतिष्ठीत मान्यवर जणू स्वत:च्या शेतात राबराब राबावं तसं त्या डोंगर माळरानावर राबराब राबताना दिसून येत आहेत. नुसते वृक्षारोपण आणि झाडांचं संगोपनच नव्हे तर तिथे एक नैसर्गिक पार्क कसं होईल यासाठी खटाटोप चालू आहे. मोठमोठमोठ्या दगडांची रचना शिल्पात करून त्या डोंगराला आणखीच वेगळेपण देण्याचं काम होत आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणार्या तुकोबांना सजीव सृष्टीतील सर्वच जण सोयरे वाटायचे तसं सयाजीरावांना सजीव सृष्टीतील सर्वच जण सोयरे तर झाड, फुल, पान, पक्षी हे आपणच आहोत, असा भास होतो आणि त्यातूनच सयाजीरावांचे हिरवेगार मन त्या माळ रानावर रमून जाते.
बीड जिल्ह्यात एका माळरान डोंगरावर नैसर्गिक पार्क बनत आहे. अशा वेळी बीडकरांनी सयाजीरावांना साथ द्यायला हवी
. शेकडो एकर डोंगरावर लाखो झाडांची झालेली लागवड ही जेवढी सोपी वाटते तेवढेच त्या झाडांना जगवणे अवघड वाटते. आम्ही काल जेव्हा देवराईत गेलो तेव्हा तेथील ती झाडे याची देही याची डोळा पाहितले तेव्हा सयाजीरावांचं कौतुक करावं की आपल्या नशिबाला दोष द्यावं की स्वत:ला कर्मदरिद्री म्हणावं, असे एक ना अनेक विचार आले. आलिशान जीवन जगणारे अनेक हिरो आहेत परंतु दगड, माती, झाड, फुल, पान आणि पक्षी यात रमणारा सयाजीराव पाहितल्यानंतर आपण या कामी खारीचा तरी वाटा उचलायला हवा, असं प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच आता तिथं झाडांची लागवड झाली आहे. खरी गरज आहे ती झाड जगवण्याची आणि त्यासाठी हवं आहे, ते पाणी. आम्ही तमाम जनतेला आवाहन करतो, आपले वाढदिवस यासह अन्य आनंदाचे क्षण देवराईत येऊन घाला. त्याठिकाणी एखाद दुसरे पाण्याचे टँकर द्या, फुलवा ती वनराई आणि मिळवून द्या बीड शहरासह परिसराला फुकटचे ऑक्सीजन. जो कोणी देवराईत जाईल तेव्हा तिथली परिस्थिती पाहून निसर्ग काय असतो याची नक्कीच अनुभूती येईल आणि सयाजीरावांच्या बाबत अरे वा ! हा शब्द नक्कीच बाहेर पडेल. नुसते झाडे लावून पेपरात फोटो छापून आरणारे तुम्ही-आम्ही अनेकदा पाहितले.
भाग २
गणेश सावंत
सांय दैनिक - बीड.

टिप्पण्या