आधिकाऱ्यांनो तुमच्या अडचणीला उभा राहील, पण जनतेच्या कामात कुचराई केली तर गय करणार नाही-आ. बाळासाहेब आजबे

पाटोद्यात पाच तास घेतली बेठकपाटोदा प्रतिनिधी. अधिकारी हे शासन आणि जनतेचा दुवा आहेत. अधिकाऱ्यांनी कामे केली तर जनता समाधानी राहते आणि जनता समाधानी तर लोकप्रतिनिधी समाधानी राहत असतात. कारण लोकांची कामे करण्यासाठी जनतेने लोकप्रतिनिधीला निवडूण दिलेले असते. ४ डिसेंबर रोजी पाटोद्यात आ. बाळासाहेब आजबे यांनी प्रथमच अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या . कृषीअधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, वायरमन यांचा समावेश होता. प्रत्येक अधिकाऱ्यांनी नेमलेल्या गावात जाऊन जनतेची कामे करावीत, काही आडचण आली तर खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहील, परंतु काम करण्यात कुचराई केली तर अधिकाऱ्यांची गय करणार नाही असा गंभीर ईशारही दिला.
पाच तास चाललेल्या बैठकीत तहसीलदार मुंडलोक,राष्ट्रवादी चे नेते आप्पासाहेब राख, बीड जिल्हा उपाध्यक्ष दिपकदादा घुमरे, तालुकाअध्यक्ष शिवभुषण जाधव, सरपंच विजयसिंह बांगर, कल्याण जाधव, विष्णुपंत घोलप, दादासाहेब पवार, सय्यद वहाब, बाळासाहेब बेदरे, शिवाजी भवर, अविनाश पवार, मधुकर येवले , गटविकास अधिकारी मिसाळ, नायब तहसीलदार ढाकणे, टाक , सा. बा.चे फुंदे आदी उपस्थिती होते.
पुढे बोलताना आ. बाळासाहेब आजबे म्हणाले की, अनेक अधिकाऱ्यांना दोन-तीन गावांचे पदभार आहेत, त्यामुळे काम करण्यासाठी अडचणी येतात हे मला माहीत आहे ,परंतु प्रत्येक गावात दोन दिवस जाऊन तेथिल शेतकऱ्यांना विविध योजनेंची माहीती आणि मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याने गावात जाणे अवश्यक असल्याचे सांगितले. जेंव्हा गरज पडेल तेंव्हा शेतकऱ्याच्या मदतीला धाऊन जा, गावातील पारावर बसा, एकदा सवय लागली की, शेतकरी तुमची वाट पाहतील. ठराविक चौकटीत काम न करता तुम्हाला अवगत असलेले ज्ञान जनतेला द्या, तलाठी, ग्रामसेवक, कृषीअधिकारी, वायरमन हे ग्राउंडवर काम करणारी अधिकारी आहेत. जनतेने मोठ्या अपेक्षेने मला निवडून दिले आहे. पाच वर्षे मी सेवा करणार आहे. मला तुमची साथ हवी आहे, मी तुम्हाला साथ देईन असा विश्वास अधिकाऱ्यांना देत अडचण आली तर मला फोन करा मि तुमच्यासाठी कधीही उभा राहील, परंतु जनतेचे कामे करा, कामे झाली नाही आणि जनतेच्या तक्रारी आल्या तर गय करणार नाही असा ईशाराही दिला. गावस्तरावर कामे करताना ग्रामसेवकांना अडचणी येतात, एक पार्टी तक्रार करीत असल्याने अधिकारी काम करण्यासाठी धजावत नाहीत, परंतु यावर मार्ग काढण्यासाठी आ. सुरेश धस, मा.आ. भिमराव धोंडे, मा.आ. साहेबराव दरेकर यांच्या सोबत चर्चा करुन यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु असे सांगितले. कृषी कर्यालयाचे कर्मचारी काम करण्यासाठी अनुकूल नसतात अशा तक्रारी करण्यात आल्या. शेतकर्यांना कृषी अधिकारी कोणत्याच प्रकारचे मार्गदर्शन करीत नाहीत असा आरोप भायाळाचे सरपंच विजयसिंह बांगर यांनी यावेळी केला. लवकरच जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी महिन्यातुन एक दिवस ठेवला जाईल आणी जनतेच्या आलेल्या तक्रारी सुटल्या की नाही याचा पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आ. बाळासाहेब आजबे यांनी स्पष्ट केले.एकंदरीत आ. बाळासाहेब आजबे यांची काम करण्याची पद्धत जनतेच्या हिताची असल्याने याबाबत समा धान व्यक्त होत असुन प्रत्यक्षात अधिकारी कामे कसे करतात हे येणार काळच ठरणार आहे. तर अधिकाऱ्यांच्या वतीने तुमच्या अपेक्षेप्रमाणे आम्ही कामे करुत असा विश्वास आ. बाळासाहेब आजबे काका यांना दिल्याने एका नव्या पर्वाला आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघात सुरुवात होणार आहे असे दिसुन येत आहे.

टिप्पण्या